Indian Railway Recruitment 2022 | सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! भारतीय रेल्वेत क्रीडा कोट्या अंतर्गत भरती; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Indian Railway Recruitment 2022 | भारतीय रेल्वेत (Indian Railway) नोकरी करणाऱ्या इच्छुक उमेदवारांसाठी महत्वाची माहिती उपलब्ध झाली आहे. भारतीय रेल्वेत क्रिडा कोट्याअंतर्गत (दक्षिण पूर्व रेल्वे) भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. या भरतीबाबत (Indian Railway Recruitment 2022) अधिसुचना जारी करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी सविस्तर माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट देणे आवश्यक आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या.

 

एकूण पदे – 21

अर्ज प्रक्रिया कशी असणार ?
इच्छुक उमेदवारांनी प्रथम rrcser.co.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

होम पेज उघडल्यानंतर भरती संबंधित लिंकवर क्लिक करावे.

आवश्यक माहिती आणि कागदपत्रे अपलोड करावे.

संपूर्ण माहिती व्यवस्थित वाचल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करावे.

त्यानंतर अर्ज पत्र डाऊनलोड करावं

 

वयाची अट – 1 जानेवारी 2022 रोजी 18 ते 25 वर्षे दरम्यान असावं

 

अर्ज शुल्क –
UR/OBC साठी परीक्षा शुल्क 500 /- रुपये आहे

SC/ST/PwD श्रेणीतील उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क 250/- रुपये आहे.

बँक ड्राफ्ट/आयपीओ FA आणि CAO, साउथ ईस्टर्न रेल्वे, गार्डन रीच -700043 डिपॉझिट करावा.

 

अर्ज करण्याची शेवटीची तारीख – 3 जानेवारी 2022 ते 2 फेब्रुवारी 2022

अधिकृत वेबसाइट – rrcser.co.in

 

महत्वाची माहिती –
राज्य, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभागी होणाऱ्या उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज करावेत.

ईशान्येकडील राज्ये, सिक्कीम, जम्मू आणि काश्मीर, लाहौल आणि स्पिती जिल्हा आणि हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यातील पांगी उपविभाग, अंदमान आणि निकोबार बेटे आणि लक्षद्वीप मधील रहिवाशांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 फेब्रुवारी 2022 असणार आहे.

 

Web Title : Indian Railway Recruitment 2022 | government jobs indian railway recruitment 2022 sports cota

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Indian Railways | रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची माहिती; कोरोनामुळे बंद असलेल्या ‘प्रगती एक्स्प्रेस’, ‘पुणे-भुसावळ एक्स्प्रेस’ रेल्वेगाड्या पुन्हा धावणार

 

Ajit Pawar | अजित पवारांची 20 लाखाच्या खंडणी प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

 

Devendra Fadnavis | शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाला राष्ट्रीय अस्तित्वच नाही; देवेंद्र फडणवीसांची सडकून टीका