Indian Railway : आता ट्रेनमध्ये मिळणार आवडीचं जेवण, रेल्वेनं प्रवाशांच्या सुविधेसाठी सुरू केली ‘E-Catering’ सेवा

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारतीय रेल्वे (Indian Railway) ने गाड्यांमध्ये ई-केटरिंग (E-Catering) सेवा पूर्ववत केली आहे. तथापि, ही सुविधा केवळ निवडक स्थानकांवर सुरू केली जाईल. ज्या स्थानकांवर ई-केटरिंग सेवा दिली जाईल तेथे केंद्र आणि संबंधित राज्य सरकारच्या सर्व आरोग्याशी संबंधित नियमांचे पालन केले जाईल. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार ट्रेनमध्ये जेवण शिजवणे, एसी बोगीमध्ये ब्लँकेट, उशा आणि चादरींची सुविधा बंद करण्यात आली होती, परंतु आता भारतीय रेल्वेने ट्रेनमध्ये ई-केटरिंग सेवा पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिली आहे.

आयआरसीटीसी (IRCTC) च्या या सुविधेद्वारे प्रवासी आपल्या आवडीच्या रेस्टॉरंटमधून ऑनलाइन ऑर्डर करू शकतात. ऑर्डर देताना प्रवाशांना कोणत्या स्टेशनवर आणि कोणत्या वेळी त्यांचे भोजन येईल याबद्दल सांगितले जाईल. प्रवाशाला कुठेही जाण्याची गरज भासणार नाही.

आयआरसीटीसीने काही रेल्वे स्थानकांवर ई-केटरिंग सेवा सुरू करण्यास रेल्वे मंत्रालयाकडे परवानगी मागितली होती, ज्यास रेल्वे मंत्रालयाने मान्य केले आहे. आयआरसीटीसी जानेवारी 2021 च्या शेवटच्या आठवड्यापासून ऑपरेट करण्यास तयार आहे. भारतीय रेल्वेने ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली. रेल्वेने ट्वीटमध्ये म्हटले आहे की, ‘निवडक रेल्वे स्थानकांवर ई-केटरिंग सेवा पुन्हा सुरू करण्यास रेल्वेने परवानगी दिली आहे.’

https://publish.twitter.com/?url=https://twitter.com/RailMinIndia/status/1350292573311549442

सूचनांचे काटेकोरपणे पालन केले जाईल

कंपनीने कठोर मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत, ज्यामध्ये ऑपरेटिंगच्या दरम्यान अनेक वेळा रेस्टॉरंट स्टाफ आणि डिलिव्हरी कर्मचार्‍यांचे थर्मल स्कॅनिंग, नियमित अंतराने स्वयंपाकघर स्वच्छ करणे, रेस्टॉरंट स्टाफ आणि डिलिव्हरी कर्मचार्‍यांनी संरक्षक फेस मास्क किंवा फेस शील्डचा वापर करणे यांचा समावेश असेल. सोबतच असेही म्हटले गेले आहे की भोजन तेव्हाच तयार करावे जेव्हा शरीराचे तापमान 99 डिग्री फारेनहाइटपेक्षा कमी असेल.

वितरण कर्मचार्‍यांना मार्गदर्शक सूचना

वितरण कर्मचार्‍यांसाठी मार्गदर्शक सूचना देखील योग्य रितीने तयार केल्या गेल्या आहेत व त्या पाळणे बंधनकारक असणार आहे. यामध्ये हात धुतल्यानंतरच ऑर्डर घेणे, वितरण कर्मचार्‍यांकडून ‘आरोग्य सेतु’ अ‍ॅपचा अनिवार्य वापर, शून्य मानवी संपर्क सुनिश्चित करण्यासाठी संपर्क रहित वितरण, संरक्षक फेस मास्क किंवा कव्हर्सचा वारंवार वापर आणि वितरणानंतर वितरण बॅगचे सॅनिटायझेशन करणे या सूचनांचा यात समावेश आहे.