अनोखी सुविधा ! आता प्रवाशांचे कष्ट वाचणार, तुमच्या घरुन तुमची बॅग रेल्वेच स्टेशनवर घेऊन येणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  –  प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि आरामदायी व्हावा याकरिता भारतीय रेल्वेने आता एक अनोखी सुविधा सुरु केली आहे. तुमची बॅग घरापासून रेल्वे स्टेशन किंवा रेल्वे स्टेशनपासून घरी घेऊन जाण्यासाठी विशेष सुविधा सुरु करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. यामुळे आता प्रवाशांना त्यांची बॅग किंवा लगेज उचलण्यासाठी जास्त कष्ट घेण्याची गरज पडणार नाही. कारण रेल्वे प्रशासन ते काम करणार आहे. पश्चिम रेल्वे प्रशासनाने ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे. प्रवाशांना या सुविधेचा नक्की चांगला फायदा होणार आहे.

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, अहमदाबाद रेल्वे स्टेशनवर सर्वात आधी ही सुविधा सुरु केली आहे. NINFRIS च्या अंतर्गत ही सुविधा सुरु केल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. हीच सुविधा आगामी काळात सर्वच रेल्वे स्टेशनवर सुरु केली जाणार आहे. या सुविेधेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना Bookbaggage.com वेबसाईटवर बुकिंग करणे आवश्यक आहे. तिथे प्रवाशांना लगेजची साईज आणि वजन यासंबंधित माहिती द्यावी लागेल. या माहितीच्या आधारावर प्रवेशांना सर्व्हिस चार्ज द्यावा लागणार आहे.