नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रेल्वेने प्रवास (Indian Railways) करणार्यांसाठी महत्वाची बातमी आहे. जर तुम्ही सुद्धा रेल्वे प्रवास करत असाल तर रेल्वेकडून देण्यात आलेला इशारा आवश्य जाणून घ्या. इंडियन रेल्वेने रेल्वे प्रवासाबाबत प्रवाशांसाठी अलर्ट जारी केला आहे. सणासुदीच्या काळात ट्रेनमध्ये गर्दी वाढत आहे. ट्रेनमध्ये आग लागण्याच्या दुर्घटनांची संख्या पाहता रेल्वे (Indian Railways) ने प्रवाशांसाठी अधिकृत नोटिफिकेशन (Official Notification) जारी केले आहे. रेल्वेने ही सक्ती प्रवाशांची सुविधा आणि सुरक्षेसाठी केली आहे.
रेल्वेने सांगितली ही बाब
रेल्वेने ट्विट करत म्हटले आहे की, ट्रेनमध्ये प्रवासादरम्यान प्रवाशांनी ज्वालाग्राही साहित्य (Indian Railways Ban Flammable Goods) सोबत ठेवू नये आणि कुणालाही सोबत घेऊन जाऊ देऊ नये, हा एक दंडनीय गुन्हा आहे. रेल्वे कायदा, 1989 चे कलम 164 च्या अंतर्गत हा दंडनीय गुन्हा असून अशा व्यक्तीला 3 वर्षांपर्यंत कारावास किंवा हजार रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
या वस्तूंवर लावला आहे प्रतिबंध
रेल्वेच्या डब्ब्यातून (Indian Railways) प्रवाशी केरोसिन, सुके गवत, स्टोव्ह, पेट्रोल, रॉकेल, गॅस सिलेंडर,
मॅचिस, फटाके किंवा आग पसरवणार्या कोणत्याही वस्तू सोबत घेऊन प्रवास करूशकत नाहीत. याबाबत रेल्वेने सक्त इशारा दिला आहे.
–
रेल्वे परिसरात स्मोकिंग करणे गुन्हा
याशिवाय आगीच्या घटना नियंत्रित करण्यासाठी रेल्वेने (Indian Railways) बनवलेल्या योजनेंतर्गत जर कुणी स्मोकिंग करताना पकडला गेला
तर त्यास 3 वर्षांपर्यंत कारावास सुद्धा होऊ शकतो. शिवाय दंडसुद्धा भरावा लागू शकतो. रेल्वे परिसरात सिगरेट/विडी पिणे दंडनीय गुन्हा आहे.
Web Title :- Indian Railways | indian railways rule railway ban carry flammable goods and smoking and during travel irtct news in marathi
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update