Indian Railways | रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर, शताब्दी आणि दुरंतो ट्रेनमध्ये मिळेल फ्रेश फूड, जाणून घ्या डिटेल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भारतीय रेल्वेने (Indian Railways) प्रवास करणार्‍या प्रवाशांसाठी चांगली बातमी आहे. आता लवकरच ट्रेनमध्ये प्रवास करताना ताजे जेवण मिळेल. काही दिवसांपूर्वीच रेल्वे बोर्डाने (Railway Board) ट्रेनमध्ये पँट्री कार सुरू करण्याचा आदेश दिला होता. (Indian Railways)

 

आता पश्चिम रेल्वे झोनने (Western Railway) शताब्दी एक्सप्रेस (Shatabdi Express) आणि दुरंतो एक्सप्रेस (Duronto Express) ट्रेनमध्ये शिजवलेले जेवण आणि रेडी टू ईट (Ready To Eat) मीलसोबत ऑनबोर्ड कॅटरिंग सर्व्हिस पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. (Indian Railways)

 

पश्चिम रेल्वेकडून जारी एका वक्तव्यानुसार, ट्रेन नंबर 12009/10 मुंबई सेंट्रल-अहमदाबाद-मुंबई सेंट्रल शताब्दी एक्सप्रेस आणि ट्रेन नंबर 22209/10 मुंबई सेंट्रल-नवी दिल्ली-मुंबई सेंट्रल दुरंतो एक्सप्रेसमध्ये ऑनबोर्ड कॅटरिंग सर्व्हिस 10 डिसेंबर 2021 पासून सुरू केली जाईल. प्रवाशांना 10 डिसेंबरपासून सुरू होणार्‍या प्रवासाच्या तारखांसाठी कॅटरिंग सर्व्हिसने ऑप्टिंग आऊट पर्याय दिला आहे.

रेल्वेने याबाबत सर्व संबंधित विभाग आणि स्टेक होल्डर्सला अगोदरच एक आदेश जारी केला होता.
आदेशानुसार, सध्या हे केवळ राजधानी, शताब्दी, दुरंतो, वंदे भारत, तेजस आणि गतिमान कॅटेगरीच्या ट्रेनसाठी लागू होईल.
त्या प्रवाशांसाठी, ज्यांनी अगोदरच तिकिट बुक केले होते.

 

आदेशानुसार, आयआरसीटीसी संबंधित झोनल रेल्वेला त्या तारखेबाबत सूचित करेल,
जेव्हापासून अ‍ॅडव्हान्स रिझर्व्हेशन पिरियडच्या आत येणार्‍या प्रवाशासाठी एखाद्या विशेष ट्रेनमध्ये शिजवलेल्या जेवणासह ऑनबोर्ड कॅटरिंग सर्व्हिस पुन्हा सुरू केली जाईल.

 

झोनल अधिकार्‍यांना सुद्धा एसएमएस आणि ई-मेलच्या माध्यमातून ई-तिकिट प्रवाशांना सूचित करणे आवश्यक आहे की, ज्यांनी अगोदरच तिकिट बुक केले आहे.

 

Web Title :- Indian Railways | indian railways to resume onboard catering services in shatabdi and duronto express trains details here

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Rural Police | पुणे ग्रामीण पोलिसांकडून नारायणगाव, भिगवण, शिरुर, ओतुर परिसरात छापे ! 9 लाखांचा गांजा व गांजाची झाडे जप्त, 6 जणांना अटक

Omicron Covid Variant in Maharashtra | अखेर महाराष्ट्रात ‘ओमिक्रॉन’चा शिरकाव ! कल्याण-डोंबिवलीत पहिला रुग्ण

SBI ATM New Rule | एसबीआयच्या कोट्यावधी ग्राहकांसाठी महत्वाची माहिती ! ATM मधून पैसे काढण्यासाठी लागणार OTP

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ विशेष योजनेत पती-पत्नीला मिळतो 59,400 रुपयांचा फायदा, तुम्ही सुद्धा घ्या ‘लाभ’

BJP MLA Ashish Shelar | ‘महाराष्ट्रात ‘गब्बर’ सारखा कारभार सुरू, 34 कोटींचा भूखंड पळवून बिल्डरच्या घातला घशात’ – आशिष शेलार