खुशखबर ! आता ‘एकदम’ फ्री मिळणार रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट, फक्त करावं लागणार ‘हे’ काम, जाणून घ्या (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रेल्वे प्लॅटफॉर्मचे तिकीट सध्याला १० रुपयांना मिळते. परंतु आता ते आपल्याला विनामूल्य मिळणार आहे. भारतीय रेल्वेने दिल्लीत आनंद विहार रेल्वे स्टेशनवर असे एक मशीन बसवले आहे, तेथून तुम्हाला रेल्वेची तिकिटे विनामूल्य भेटतील. तथापि, यासाठी आपल्याला मशीनसमोर दंड-बैठका काढावे लागणार आहे. जे लोक १८० सेकंदात ३० वेळा दंड-बैठका काढतील, तेच लोक या विनामूल्य प्लॅटफॉर्म तिकिटासाठी पात्र ठरतील.

तंदुरुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी रेल्वेकडून हा उपक्रम राबविला जात आहे. या मशीनला ‘फिट इंडिया दंड बैठक मशीन’ नाव देण्यात आले आहे. हा मशीनचा व्हिडीओ रेल्वेमंत्री पीयूष गोयल आणि रेल्वे मंत्रालय यांनी ट्विट केला आहे. रेल्वेच्या या अनोख्या उपक्रमाचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.

असे कार्य करेल मशीन?
मशीनसमोर दोन फूट प्रिंट बनवले आहेत. यावर आपल्याला उभे राहून १८० सेकंदात ३० वेळा दंड बैठक कराव्या लागतील. मशीनमध्ये लावण्यात आलेल्या डिस्प्लेवर आपला वेळ आणि बिंदू दर्शविला जाईल. १८० सेकंद संपताच आपल्याला प्लॅटफॉर्म तिकीट मिळेल.

भारतीय रेल्वे जुन्या डब्यांमध्ये काही किरकोळ बदल करून त्यांना कामासाठी उपयुक्त असे बनवत आहे. या डब्यांपासून म्हैसूरमधील एका शाळेत एक सुंदर वर्ग बनवण्यात आला आहे, तर बिहारच्या दानापूर येथे कर्मचारी कॅन्टीन आणि दिल्लीच्या राष्ट्रीय रेल्वे संग्रहालयात कार्यालय बांधले गेले आहे अशा अतिशय मनोरंजक पद्धतीने या डब्यांचा वापर केला जात आहे.