Indian Railways, IRCTC | डुप्लीकेट तिकिटाची मागणी केव्हा करता येते? जाणून घ्या पद्धत

नवी दिल्ली : Indian Railways, IRCTC | कोरोना महामारीदरम्यान भारतीय रेल्वेद्वारे अनेक ट्रेनचे संचालन केले जात आहे. मात्र, रेल्वे अजूनही पूर्ण क्षमतेसह ट्रेनचे संचालन करू शकलेली नाही. अनेक मार्गावर ट्रेनची संख्या वाढवली (Indian Railways, IRCTC) आहे.

अनेकदा प्रवाशी घाईगडबडीत आपले तिकिट सोबत आणण्यास विसरतात किंवा हरवतात. अशावेळी त्यांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागतो. ट्रेन प्रवासापूर्वी एखाद्या कारणामुळे डुप्लीकेट तिकिटा (duplicate ticket) ची आवश्यकता भासते. अशावेळी प्रवाशांना समजत नाही की ते कुठून मिळवावे (How to get a duplicate train ticket)?

रेल्वेच्या नियमानुसार, जर एखाद्या, हरवलेल्या, फाटलेल्या, खराब झालेल्या तिकिटाची स्थिती आरक्षित किंवा आरएसी असेल तर आरक्षण चार्ट तयार होण्यापूर्वी डुप्लीकेट तिकिटाची मागणी करता येऊ शकते. यासाठी स्टेशन मास्तरसाठी शुल्क भरून मुळ तिकिटाच्या बदल्यात एक डुप्लीकेट तिकिट जारी केले जाऊ शकते.

जर रिझर्व्हेशन चार्ट तयार झाल्यानंतर डुप्लीकेट तिकिटाची मागणी केली तर एकुण प्रवासभाड्याच्या
50% इतकी रक्कम भरल्यास डुप्लीकेट तिकीट जारी केजे जाऊ शकते. रिझर्व्हेशन चार्ट तयार
झाल्यानंतर आरएसी तिकिटाच्या बदल्यात डुप्लीकेट तिकिट जारी केले जाऊ शकत नाही.

डुप्लीकेट तिकिटासाठी प्रवाशांकडे त्यांचे ओळखपत्र मागितले जाऊ शकते. रिझर्व्हेशन
काऊंटरवरून घेतलेले तिकिट डिजिटल फॉर्ममध्ये दाखवणे मान्य नसते. डुप्लीकेट तिकिट
मिळवण्यासाठी प्रवाशांनी पीएनआर नंबर सुद्धा लक्षात ठेवला पाहिजे. यामुळे सहजपणे डुप्लीकेट
तिकीट मिळू शकते.

हे देखील वाचा

PF Account मध्ये 2 दिवसांत येणार व्याजाचे पैसे ! जाणून घ्या EPFO नं याबाबत काय दिली माहिती

Maharashtra Night Curfew | राज्यात पुन्हा नाईट कर्फ्यू लागण्याची शक्यता

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : indian railways irctc when train passengers can get duplicate ticket

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update