Maharashtra Night Curfew | राज्यात पुन्हा नाईट कर्फ्यू लागण्याची शक्यता

जालना : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Maharashtra Night Curfew | केंद्राने राज्याला रात्रीच्या संचारबंदीची (Maharashtra Night Curfew) शिफारस केल्यानंतर राज्यात अधिक काळजीची गरज असल्याचे मत आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी व्यक्त केलं. केरळमधील (Kerala) ओनम सणाच्या (Onam festival) काळात झालेल्या कोरोना (Corona) प्रादुर्भाव पाहता केंद्राच्या सुचनेची अंमलबजावणी होईल, मात्र, याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील, अशी माहिती राजेश टोपे यांनी जालना येथे पत्रकारांशी बोलताना दिली.

सध्या केरळमध्ये ओणम सणामुळे कोरोनाचे प्रकरण वाढले आहेत. कोरोनाने पुन्हा आपले डोकं वर काढले आहे. केरळमध्ये सध्या केरळच्या मुख्यमंत्र्यांनी रात्री 10 वाजल्या नंतर सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. सध्या केरळमध्ये कोरोनाचे प्रकरण जास्त वाढले आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्राचा (Maharashtra) नंबर आहे. यामुळे केंद्र सरकारची चिंता वाढत आहे.

याला विचारात घेता केंद्र सरकारने (Central Government) या दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून रात्रीची संचारबंदीचा विचार करण्यास सांगितले होते. केरळमध्ये रात्रीची संचारबंदी लागू केली आहे.
महाराष्ट्रात रात्रीच्या संचारबंदीचा निर्णय मुख्यमंत्री घेतील असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
ज्या जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्ण नाहीत तिथे शाळा सुरु होऊ शकतात का याची चाचपणी करतोय.
5 तारखेपर्यंत सर्व शिक्षक आणि सबंधित कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी स्पेशल ड्राइव्ह घेण्यात येणार आहे, असेही टोपे यांनी सांगितले.

Web Title : Maharashtra Night Curfew | night curfew will be imposed in the state again rajesh tope maharashtra news regional

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update