आशियातील सर्वात ‘खराब’ चलन बनलं भारतीय ‘रूपया’, तुमच्या खिशावर थेट ‘परिणाम’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जागतिक बाजारातील विक्री, कच्च्या तेलाच्या दरातील घसरण आणि कोरोना व्हायरसचे संकट यामुळे भारतीय चलन असलेल्या रूपयाचे कंबरडे मोडले आहे. गुरूवार आणि शुक्रवारनंतर आज सोमवारीसुद्धा डॉलरच्या तुलनेत रूपयात विक्रमी घसरण झाली. याच कारणामुळे ब्लूमबर्गने आपल्या रिपोर्टमध्ये रूपयाला सर्वात खराब कामगिरी करणारी आशियातील करन्सी घोषित केले आहे. सोमवारी भारतीय रुपया प्रति डॉलर 74.16 च्या स्तरावरून घसरून मागील 52 आठवड्यातील किमान स्तरावर घसरला. सोमवारी सुरूवातीच्या व्यवहारात रूपया डॉलरच्या तुलनेत 74.08 वर होता.

सतावत आहे मंदीची भिती

स्थानिक इक्विटी मार्केटमध्ये मोठी घसरण आणि कोरोना व्हायरसच्या संकटामुळे अर्थव्यवस्थेत मंदीची शंका पाहता फॉरेक्स मार्केटमध्ये रुपयाची सुरूवात 73.99 च्या स्तरावर झाली. यानंतर 16 पैसे घसरणीसह तो 74.03 च्या स्तरावर घसरला. परंतु, परदेशी बाजारातही अमेरिकन करन्सीमधील कमजोरी आणि कच्च्या तेलाच्या किमतीमधील घसरणीमुळे रूपयाला हलकासा आधार दिसून आला, परंतु ट्रेडर्सचे म्हणणे आहे की, जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांमधील मंदीची भिती भारतीय रूपयाची अवस्था आणखी गंभीर करू शकते.

बाजारात अगोदरच लिक्विडिटीची कमतरता

मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, भारतीय रिझर्व्ह बँकद्वारे रूपयाला लगाम लावण्यासाठी बाजारात उपलब्धतेला अधिक करण्याचा निर्णय देशातील काही मोठ्या उधारकर्त्यांच्या फायद्यावर परिणाम करू शकतो. यावर्षी भारतीय रूपया आशियाई बाजारात सर्वात खराब कामगिरी करणारी करन्सी ठरला आहे.

रेटिंग एजन्सी इकरा लिमिटेडच्या कार्तिक श्रीनिवासन यांनी म्हटले, सिस्टममध्ये लिक्विडिटी पहिल्यापेक्षा टाइट आहे आणि हा आरबीआयद्वारे रूपया मजबूत करण्याचा प्रयत्न बँकांवर दबाव टाकू शकतो. बँकांच्या फायद्यावर परिणाम होईल आणि कर्जदारांना डिपॉझिट आणि कर्जातून होणार्‍या कमाईवर परिणाम होईल.

आपल्या खिशावर काय परिणाम होणार

दोन गोष्टी एकसाथ होत आहेत. एक तर रूपयाचे मुल्य घसरत आहे. अन्य देशांकडून येणार्‍या सामानासाठी जास्त पैसे चुकवावे लागतील. जर हीच स्थिती राहिली तर येत्या काळात आपल्या खिशावर जास्त भार पडणार आहे.

डॉलरची किंमत वाढल्याने महागाई किती वाढते

एका अंदाजानुसार डॉलरच्या दरात एक रूपयाच्या वाढीने तेल कंपन्यांवर 8,000 करोड रूपयांचा भार पडतो. यामुळे त्यांना पेट्रोल आणि डिझेलचे दर नाईलाजाने वाढवावे लागतात. पेट्रोलियम उत्पादनांच्या किमतीत 10 टक्क्यांची वाढ झाल्यास महागाई सुमारे 0.8 टक्के वाढते. याचा थेट परिणाम खाण्या-पिण्याच्या आणि वाहतूकीच्या खर्चावर होतो.

सध्या, स्थानिक बाजारात पेट्रोलचे दर मागील 9 महिन्यातील सर्वात खालच्या स्तरावर आहेत. स्थानिक बाजारात पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये सतत घसरण दिसून येत आहे. याचे सर्वात मोठे कारण अंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात झालेली घसरण हे आहे.