Indian Soldier Suicide | खळबळजनक ! लष्करी कॅम्पमध्ये संदीप शिंदे यांची स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या, दोनच दिवसांपुर्वी मेजरनं केलं होतं ‘सुसाईड’

श्रीनगर : वृत्तसंस्था – दोन दिवसांपूर्वी जम्मू काश्मीरमधील (Jammu and Kashmir) रामबन जिल्ह्यातील महू बाल याठिकाणी एका मेजरनं आत्महत्या (Major suicide) केल्याची घटना घडली होती. ही घटना 11 डिसेंबर रोजी रात्री घडली होती. मेजरनं आपल्या राहत्या घरात गोळी झाडून आत्महत्या केली होती. ही घटना ताजी असताना आणखी एका जवानाने (Indian Soldier Suicide) गोळी झाडून आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील (Kupwara District) द्रांग्यारी चौकिबाल (Drangyari Chowkibal) येथे कर्तव्यावर असलेल्या एका जवानाने (Indian Soldier Suicide) स्वत:वर गोळी झाडून (shot himself) आत्महत्या केली.

 

संदीप अर्जुन शिंदे (Sandeep Arjun Shinde) असे आत्महत्या करणाऱ्या भारतीय जवानाचं (Indian Soldier Suicide) नाव आहे. तो हवालदार रँकवरील (Constable rank) जवान असून त्याची पोस्टींग द्रांग्यारी चौकिबाल येथे करण्यात आली होती. आज (सोमवार) पहाटे साडेचारच्या सुमारास शिंदे यांनी स्वत:च्या सर्व्हिस रायफलमधून (service rifle) गोळी झाडून आत्महत्या केली आहे. भल्या पहाटे गोळी झाडल्याचा आवाज आल्यानंतर कॅम्पमध्ये खळबळ उडाली. या घटनेची माहिती वरिष्ठांना देण्यात आली.

 

 

जखमी संदीप शिंदे यांना काही जवानांनी तातडीने श्रीनगर येथील लष्करी रुग्णालयात (Military hospital) हलवलं.
परंतु मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने जवानाचा वाटेतच मृत्यू झाला.
मृत संदीप शिंदे या जावानाने नेमकी कोणत्या कारणातून आत्महत्या केली याची माहिती अद्याप समजू शकली नाही.
घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Indian Soldier Suicide | indian soldier shinde sandeep arjun suicide by shot himself dead in kupwara district jammu kashmir before two days mejor end his life like this

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा