‘कंडोम’बाबत विचारलेल्या प्रश्नाचे १४ वर्षांच्या विद्यार्थिनीनं दिलं ‘असं’ उत्‍तर, त्यानंतर तिला शाळेतूनच काढलं !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सरकारचं म्हणणं आहे की, सेक्स अवेअरनेसचे शिक्षण देशातील सर्व शाळांमध्ये अनिवार्य करणं गरजेचं आहे. आज आपण एका अशा घटनेबाबत जाणून घेणार आहोत. शाळेच्या पेपरदरम्यान सेक्सशी संबंधित काही प्रश्न विचारण्यात आले. एका विद्यार्थिनीने प्रश्नाचे असे उत्तर दिले की, तिला शिक्षाही भोगावी लागली आहे.

आताच्या जमान्यात सोशल मीडियावर काही व्हायरल व्हायला अजिबात वेळ लागत नाही. एका मुलीची उत्तरपत्रिकाही सोशलवर खूप व्हायरल होताना दिसत आहे. अवघ्या 14 वर्षांच्या मुलीने पेपरमध्ये दिलेल्या एका उत्तराने सोशल मीडियावर वादळ आलं आहे. पेपरमध्ये प्रश्न सेक्सदरम्यान कंडोम न वापरण्याबाबत होता. याचं उत्तर ऐकून तर शाळेतील शिक्षकही चकित झाले. क्वचितच कोणी या प्रश्नाचं असं उत्तर देऊ शकलं असतं. मुलीने उत्तर दिल्यानंतरही तिला शाळेतून काढण्यात आलं आहे.

मारिया असं या मुलीचं नाव आहे. या मुलीला पेपरदरम्यान विचारण्यात आलं होतं की, लैगिंक संबंधा दरम्यान जर तुमचा पार्टनर कंडोम वापरण्याचं नाकारत आहे आणि याचं कारण सांगत आहे की, ‘मी कंडोम खरेदी केला नाही. कारण मला कंडोम खरेदी करायला लाज वाटते.’ या मारिया नावाच्या मुलीची चूक फक्त एवढीच झाली की, तिने न घाबरता या प्रश्नाचं उत्तर दिलं. मारियाने उत्तर देत लिहिलं होतं की, “हा तुझा प्रॉब्लेम आहे. जर माझ्यासोबत लैंगिक संबंध ठेवायचे असतील तर कंडोमचा वापर करावा लागेल. नाही तर माझ्याकडे व्हजायना नाहीये.”

या पूर्ण घटनेवर स्पष्टीकरण देताना शाळेचे व्यवस्थापक म्हणाले की, “विद्यार्थिनीचं वय 14 वर्षे आहे. परंतु तिने पेपरमध्ये विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना असे शब्द वापरले आहेत. जे तिच्या वयात अजिबात योग्य नाही. फक्त हेच कारण आहे की, मुलीला शाळेतून काढण्यात आलं आहे. आतापर्यंत मारियाच्या या उत्तरपत्रिकेला 3 मिलियन्सहून अधिक लोकांनी पाहिले आहे. शाळेतून काढल्यानंतर मुलीने तिची उत्तरपत्रिका तिच्या भावाच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केली होती. या उत्तरपत्रिकेला मोठ्या संख्येने सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –