भारताचा पहिला 5जी स्मार्टफोन Realme X50 Pro होतोय 24 ला ‘लॉन्च’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हयरसच्या भीतीमुळे जगातील सर्वात मोठा मोबाइल वर्ल्ड काँग्रेस हा कार्यक्रम पुढे ढकललेला आहे. २४ फेब्रुवारीला हा कार्यक्रम बार्सिलोनामध्ये पार पडणार होता. हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याने आपला स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी केलेल्या कंपन्यांनी आता बदल करण्यास सुरुवात केली आहे. भारतातील पहिला 5G स्मार्टफोन चीन मधील रियलमी कंपनी पहिला 5G स्मार्टफोन Realme X50 Pro भारतात २४ फेब्रुवारीला लाँच करणार आहे.

भारतातील पहिला 5G स्मार्टफोन असला तरी भारतात ५ जी कनेक्टिविटी सुरू होण्यास अजून बराच वेळ लागणार आहे. नवी दिल्लीतील एका कार्यक्रमात हा फोने लॉन्च करणार आहेत. याआधी कंपनी या फोनला MWC मध्ये लाँच करणार होती. स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉमच्या फ्लॅगशीप प्रोसेसर स्नॅपड्रॅगन ८६५ सह देण्यात येणार आहे. तसेच या फोनमध्ये १२ जीबी पर्यंत रॅम आणि २५६ जीबी पर्यंत UFS 3.0 स्टोरेज दिला जाणार आहे. विशेष म्हणजे या फोन मध्ये ६५ वॅटची सुपर डर्ट चार्ज टेक्नोलॉजी देण्यात आली आहे. फोन लाँचिंग कार्यक्रमासंदर्भातील निमंत्रण मीडियांना पाठवण्यात आले आहेत.

फोनच्या टीझरवरून यात ड्युअल सेल्फी कॅमेरा असणार आहे. या फोनमध्ये ६ कॅमेरे असल्याचे सांगण्यात येत आहे. यात ६४ मेगापिक्सलचा क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे.