मोस्ट वॉन्टेड डॉन ‘दाऊद’ इब्राहिम ‘पाकिस्तानातच’, अमेरिकेचा दावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतासाठी मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानातच असल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. या संबंधित माहिती अमेरिकेतील तपास यंत्रणा एफबीआयने लंडनच्या कोर्टात सादर केली. दाऊद पाकिस्तानातच कराचीत असून तेथून तो आपली आंतरराष्ट्रीय स्तरावरील नेटवर्क चालवत आहे.

डी कंपनी पाकिस्तान, भारत आणि यूएई मध्ये
दाऊद इब्राहिमचा साथीदार जाबीर मोतीवाला याच्या अमेरिकेतील प्रत्यार्पणाच्या सुनवाणीच्या एक दिवस आधीच अमेरिकेतील वकील जॉन हार्डी यांनी दाऊद पाकिस्तानात कराचीत असल्याचे सांगितले. ‘डी’ कंपनीचा तपास एफबीआय न्यूयॉर्कमध्ये करत असल्याचे देखील हार्डी यांनी सांगितले. हार्डी असेही म्हणाले की डी कंपनी पाकिस्तान, भारत आणि यूएई मध्ये पसरलेली आहे. दाऊद भारतीय मुसलमान असून पाकिस्तानात राहत असल्याचे हार्डी यांनी स्पष्ट केले.

गेल्या १० वर्षाच्या काळात दाऊदच्या डी कंपनीने अमेरिकेत आपले साम्राज्य वाढवण्यास सुरुवात केली आहे. मोतीवाला याची लंडन कोर्टात चौकशी सुरु असून एफबीआयने त्याला २०१८ साली एका एजंटच्या सहाय्याने ताब्यात घेतले होते.

मोतीवाला हा थेट दाऊदच्या संपर्कात होता. मोतीवाला याला लंडन कोर्टाने जामीन नाकारला आहे. या दरम्यान त्याने केलेल्या करवायांची माहिती कोर्टात देण्यात आली होती. मोतीवाला व्हिडिओ लिंकद्वारे कोर्टाने येत्या २८ ऑगस्टला सुनवाणीत सहभागी होण्याचे आदेश दिले आहेत.

निद्रानाशाच्या गंभीर समस्येवर करा ‘हे’ घरगुती सोपे उपाय

केसांच्या प्रकारावरून निवडावे ‘तेल’, तरचं होईल ‘योग्य पोषण’

‘थर्माकॉल’च्या कपात चहा पिणे आरोग्यासाठी घातक ; जाणून घ्या साइड इफेक्ट्स

आरोग्याच्या ‘या’ समस्या किरकोळ असल्या तरी घ्या ‘डॉक्टरां’चा सल्ला