Indrani Balan Foundation | पहिली ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा ! पुनित बालन ग्रुप संघाची विजयी सलामी; द गेमचेंजर्स संघाचा तिसरा विजय!

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Indrani Balan Foundation | स्पोर्ट्सफील्ड मॅनेजमेंट तर्फे आयोजित पहिल्या ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत पुनित बालन ग्रुप (punit balan group) संघाने कल्याण संघाचा १२४ धावांनी पराभव करून स्पर्धेत विजयी सलामी दिली. द गेमचेंजर्स संघाने आपली विजयी घौडदौड कायम ठेवत सलग तिसर्‍या विजयाची नोंद केली. (Indrani Balan Foundation)

मुंढवा येथील लिजंडस् क्रिकेट मैदानावर झालेल्या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात धीरज फटांगरे याने झळकावलेल्या १०१ धावांच्या जोरावर पुनित बालन ग्रुप संघाने कल्याण इलेव्हन संघाचा १२४ धावांनी पराभव केला. धीरज फटांगरे याने ४९ चेंडूत १० चौकार आणि ७ षटकारांसह १०१ धावांची खेळी केली. दुसर्‍या बाजुने मेहूल पटेल याने ४२ चेंडूत ७ चौकार व ६ षटकारांसह ८९ धावा फटकावल्या. या दोघांनी तिसर्‍या गड्यासाठी ९३ चेंडूत १९० धावांची भागिदारी करून संघाला २५० धावांचा डोंगर उभा करून दिला.

 

 

या आव्हानाचा पाठलाग करताना कल्याण इलेव्हन संघाचा डाव २० षटकात ८ गडी गमावून १२६ धावांवर मर्यादित राहीला. पुनित बालन ग्रुप संघाच्या धीरज मंत्री (२-५), सनी मारवाडी (२-१३) आणि अक्षय दरेकर (२-२८) यांनी अचूक गोलंदाजी केली. (Indrani Balan Foundation) दुसर्‍या सामन्यात सिध्देश वारघंटे याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर द गेमचेंजर्स इलेव्हन संघाने आर्यन्स् क्रिकेट क्लब संघाचा ९ गडी राखून सहज पराभव केला. साहील कड याच्या ६१ धावांच्या जोरावर आर्यन्स् क्रिकेट क्लबने २० षटकात ७ गडी गमावून ११६ धावा धावफलकावर लावल्या. गेमचेंजर्सच्या सिध्देश वारघंटे याने २४ धावात ३ गडी बाद करून चमकदार गोलंदाजी केली. द गेमचेंजर्स इलेव्हनने हे आव्हान ९.५ षटकात व केवळ १ गडी गमावून पूर्ण केले. पवन शहा याने नाबाद ६३ धावांची तर, मिझान सय्यद याने नाबाद ३५ धावा खेळी केली. या दोघांनी दुसर्‍या गड्यासाठी ३२ चेंडूत ७५ धावांची भागिदारी करून संघाला सलग तिसरा विजय मिळवून दिला.

 

सामन्यांचा सविस्तर निकालः

१) पुनित बालन ग्रुप: २० षटकात ५ गडी बाद २५० धावा (धीरज फटांगरे १०१ (४९, १० चौकार, ७ षटकार), मेहूल पटेल ८९ (४२, ७ चौकार, ६ षटकार), अनिकेत कुंभार २७, रोहीत गुगळे २-४७) वि.वि. कल्याण इलेव्हनः २० षटकात ८ गडी बाद १२६ धावा (धर्मिन पटेल ४३ (३६, ४ चौकार, १ षटकार), चिन्मय कुरवे २०, धीरज मंत्री २-५, सनी मारवाडी २-१३, अक्षय दरेकर २-२८); सामनावीरः धीरज फटांगरे;

२) आर्यन्स् क्रिकेट क्लबः २० षटकात ७ गडी बाद ११६ धावा (साहील कड ६१ (५५, ११ चौकार),
रिषी नाळे १७, सिध्देश वारघंटे ३-२४) पराभूत वि. द गेमचेंजर्स इलेव्हनः ९.५ षटकात १ गडी बाद ११९ धावा
(पवन शहा नाबाद ६३ (३३, ९ चौकार, २ षटकार), मिझान सय्यद नाबाद ३५);
(भागिदारीः पवन आणि मिझान यांच्यात दुसर्‍या गड्यासाठी ७५ धावा (३२); सामनावीर- सिध्देश वारघंटे

 

Web Title :- Indrani Balan Foundation | First ‘Indrani Balan Winter T20 League’ cricket tournament! Puneet Balan Group’s winning opener; The Gamechangers’ third win!

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Corona | दिलासादायक ! पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 82 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Mumbai Drugs Case | आणखी एक मोठा ट्विस्ट ! समीर वानखेडेंवर NCB अधिकाऱ्याचा गंभीर आरोप; मलिकांना निनावी पत्र पाठवत, म्हणाले…

Indian Post Home Loan | आता इंडिया पोस्ट पेमेंट बँकेकडून सुद्धा मिळेल होम लोन, जाणून घ्या सविस्तर माहिती