Indrani Balan Winter T 20 League 2022 | दुसरी ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा

एमईएस क्रिकेट क्लब सलग दुसरा विजय; द गेम चेंजर्सची विजयी कामगिरी !!

 

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Indrani Balan Winter T 20 League 2022 | बालन ग्रुप (Balan Group) तर्फे आयोजित दुसर्‍या ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत एमईएस क्रिकेट क्लब संघाने सलग दुसर्‍या विजयाची नोंद केली. द गेम चेंजर्स संघाने स्पर्धेतील पहिला विजय नोंदवित गुणांचे खाते उघडले. (Indrani Balan Winter T 20 League 2022)

 

सहकारनगर येथील ल. रा. शिंदे हायस्कूल मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत हितेश वाळुंज याच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर द गेम चेंजर्स संघाने ईऑन वॉरीयर्स संघाचा ९ गडी राखून सहज पराभव करून गुणांचे खाते उघडले. पहिल्यांदा फलंदाजी करताना ईऑन वॉरीयर्स संघाला ७७ धावाच करताना आल्या. गेम चेंजर्स संघाचा हितेश वाळुंज याने १२ धावात ४ गडी टिपत प्रतिस्पर्धी संघाला वेसण घातली. प्रज्वल गौंड (२-५) आणि कर्णधार नौशाद शेख (२-१७) यांनीही अचूक गोलंदाजी केली. द गेम चेंजर्स संघाने हे आव्हान ७.४ षटकात व १ गडी गमावूण पूर्ण केले. तुशार श्रीवास्तव याने नाबाद ४४ धावांची तर, देवदत्त नातू याने २६ धावांचे योगदान संघाला सहज विजय मिळवून दिला. (Indrani Balan Winter T 20 League 2022)

सुजित उबाळे याच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर एमईएस क्रिकेट क्लबने वालेकर स्पोर्ट्स संघाचा ६ गडी राखून सहज पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना संदीप मौर्य (३५ धावा), विशाल गव्हाणे (२० धावा) आणि अमित राठोड (नाबाद २९ धावा) यांच्या फलंदाजीमुळे वालेकर स्पोर्ट्स संघाने ११९ धावा धावफलकावर लावल्या. एमईएस क्रिकेट क्लबने हे आव्हान ११.२ षटकात व ४ गडी गमावून पूर्ण केले. हर्षल हडके (४५ धावा), सुजित उबाळे (२० धावा) आणि प्रतिक पोखरनिकर (१९ धावा) यांनी संघाला सहज विजय मिळवून दिला.

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
ईऑन वॉरीयर्सः १७ षटकात १० गडी बाद ७७ धावा (निशांत नक्षरकर १५, आकाश बोराडे १३, हितेश वाळुंज ४-१२,
प्रज्वल गौंड २-५, नौशाद शेख २-१७) पराभूत वि. द गेम चेंजर्सः ७.४ षटकात १ गडी बाद ७८ धावा
(तुशार श्रीवास्तव नाबाद ४४, देवदत्त नातू २६); सामनावीरः हितेश वाळुंज;

 

वालेकर स्पोर्ट्सः २० षटकात ९ गडी बाद ११९ धावा (संदीप मौर्य ३५, विशाल गव्हाणे २०, अमित राठोड नाबाद २९,
अविनाश शिंदे ४-१३, सुजित उबाळे ३-२६) पराभूत वि. एमईएस क्रिकेट क्लबः ११.२ षटकात ४ गडी बाद १२१ धावा
(हर्षल हडके ४५, सुजित उबाळे २०, प्रतिक पोखरनिकर १९); सामनावीरः सुजित उबाळे;

 

Web Title :- Indrani Balan Winter T20 League 2022 | 2nd ‘Indrani Balan Winter T20 League’ Championship Cricket Tournament, MES Cricket Club second win in a row; A winning performance of The Game Changers !!

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Suicide attempt at Ministry | प्रियसीला न्याय मिळावा म्हणून तरुणाचा मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Nitin Gadkari | पश्चिम बंगालमधील कार्यक्रमात नितीन गडकरींना भोवळ

Janhvi Kapoor | जान्हवी कपूरने सोडली सगळी लाज, कॅमेऱ्यात कैद झाले ‘या’ अवस्थेतील फोटो