Indrani Balan Winter T20 League 2022 | दुसरी ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा ! पुना क्लब, ब्रेव्हहार्ट क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघांची विजयी कामगिरी

पुणे : Indrani Balan Winter T20 League 2022 | पुनित बालन ग्रुप (Punit Balan Group) तर्फे आयोजित दुसर्‍या ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत पुना क्लब आणि ब्रेव्हहार्ट क्रिकेट अ‍ॅकॅडमी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेत विजयी आगेकूच केली. (Indrani Balan Winter T20 League 2022)

सहकारनगर येथील ल. रा. शिंदे हायस्कूल मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत सागर मल्लेपती याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर पुना क्लब संघाने व्हिजन क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाचा ७ गडी राखून पराभव करत तिसरा विजय मिळवला. पहिल्यांदा फलंदाजी करताना व्हिजन क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा डाव १७.३ षटकात आणि ८५ धावांवर आटोपला. पुना क्लबच्या सागर मल्लेपती (३-१२) याने अचूक गोलंदाजीचे प्रदर्शन केले. प्रणय सिंग (२-२०) आणि राजकमल चौहान (२-१३) यांनी प्रतिस्पर्धी संघांना झटपट गुंडाळले. हे आव्हान पुना क्लबने १२ षटकात आणि ३ गडी गमावून पूर्ण केले. (Indrani Balan Winter T20 League 2022)

वैभव लवांडे याच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर ब्रेव्हहार्ट क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाने वालेकर स्पोर्ट्स संघाचा ४९ धावांनी सहज पराभव करून दुसर्‍या विजयाची नोंद केली. पहिल्यांदा फलंदाजी करताना ब्रेव्हहार्ट क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाने १९३ धावांचे आव्हान उभे केले. वैभव लवांडे (६४ धावा), निखील रोकडे (४० धावा) आणि अर्थव वानवे (४१ धावा) करून संघाला मोठी धावसंख्या उभी करून दिली. या आव्हानाचा पाठलाग करताना वालेकर स्पोर्ट्सचा डाव १४४ धावांवर संपुष्टात आला.

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
व्हिजन क्रिकेट अ‍ॅकॅडमीः १७.३ षटकात १० गडी बाद ८५ धावा (आकाश लोखंडे १६, अनिकेत जाधव १४,
सागर मल्लेपती ३-१२, प्रणय सिंग २-२०, राजकमल चौहान २-१३) पराभूत वि. पुना क्लबः १२ षटकात ३ गडी
बाद ८६ धावा (अकिब शेख २५, अखिलेश गावळे २२, अजिंक्य नाईक १८, बळिराम तुपे २-२०);
सामनावीरः सागर मल्लेपती;

ब्रेव्हहार्ट क्रिकेट अ‍ॅकॅडमीः २० षटकात ७ गडी बाद १९३ धावा (वैभव लवांडे ६४ (३५, ७ चौकार, ३ षटकार),
निखील रोकडे ४०, अर्थव वानवे ४१, संदीप मोर्य २-३६) वि.वि. वालेकर स्पोर्ट्सः १९.५ षटकात १० गडी बाद १४४
धावा (अमित राठोड ४४, स्वराज फाळके २२, विशाल गव्हाणे २४, अश्‍विन शिंदे ४-२८, प्रज्वल मुंगरे २-२२);
सामनावीरः वैभव लवांडे;

Web Title :- Indrani Balan Winter T20 League 2022 | Second ‘Indrani Balan Winter T-20 League’ Championship Cricket Tournament! Puna Club, Braveheart Cricket Academy teams’ winning performance

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mumbai Goa Highway Accident | मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; 9 जण ठार

KL Rahul-Athiya Shetty Wedding | लग्नाची तारीख विचारताच अथिया शेट्टीने दिली हि रिअ‍ॅक्शन; Video व्हायरल

Nandurbar Police News | दंडपाणेश्वर मंदिर संस्थेकडून एसपी पी.आर.पाटील यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांचा सत्कार