CNG आणि PNG च्या किंमतींमध्ये मोठी कपात, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने (आयजीएल) गुरुवारी सीएनजी आणि पीएनजीच्या किंमती कमी केल्या आहेत. नवीन दर 3 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतील, असे आयजीएलने म्हटले आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, सीएनजीच्या किंमतीत प्रति किलो 3.2 रुपयांची कपात केली गेली असून पाइप गॅस (पीएनजी) प्रति मानक घनमीटर 1.55 रुपयांनी घसरली आहे. हे दोन्ही दर नवी दिल्लीसाठी लागू असतील.

नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबाद मधील सीएनजीच्या किंमतीत प्रति किलो 3.60 रुपये कपात करण्यात आली आहे. 1 एप्रिल रोजी अर्ध्या वर्षाच्या पुनरावृत्तीमध्ये घरगुती नैसर्गिक गॅसच्या किंमतीमध्ये 26 टक्क्यांनी घट झाली आहे.

नवीन भाव काय आहे
ही घट झाल्यानंतर राजधानी दिल्लीत एक किलो सीएनजीची किंमत 42 रुपयांवर गेली आहे. त्याचबरोबर नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबादमध्येही ही किंमत 47.74 रुपये प्रति किलो झाली आहे. येथे पीएनजीची नवीन किंमत प्रति घनमीटर 1.65 रुपये आहे. मुजफ्फरनगरमध्ये 56.65 रुपये किलो, करनालमध्ये 49.85 रुपये आणि गुरुग्राममध्ये 54.15 किलो सीएनजी मिळेल.

दर 6 महिन्यांनी किंमती निश्चित केल्या जातात
नैसर्गिक गॅसचे दर दरवर्षी 1 एप्रिल आणि 1 ऑक्टोबर रोजी निश्चित केले जातात. 1 एप्रिल रोजी किंमतीच्या आढाव्यानंतर हे कपात जाहीर करण्यात आले आहेत. नैसर्गिक गॅसचा वापर खत आणि वीज निर्मितीमध्ये केला जातो.