महिला दिनानिमित्त खा. बापट यांच्या हस्ते 51 कर्तबगार महिलांचा सत्कार, म्हणाले – ‘महिलांची सुरक्षा महत्वाची’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जागतिक महिला दिना निम्मित भारतीय जनता पार्टी कसबा मतदारसंघाच्या महिला आघाडीकडून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचे सत्कार लाल महाल येथे आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी खासदार गिरीश बापट बोलत होते. ५१ कर्तबगार महिलांचा सत्कार खासदार गिरीश बापट व जेष्ठ रंगकर्मी जयमाला इनामदार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.

या वेळी बोलताना खा. बापट म्हणाले की, “महिला आज सर्व क्षेत्रात अग्रेसर आहेत. महिला सबलीकरण होत आहे. पण त्याच वेळी महिलांवर होणाऱ्या हल्ल्यामुळे मन व्यथित होते. हिंगणघाटसारख्या घटना भविष्यात घडू नयेत यासाठी प्रत्येक महिलेची जबाबदारी ही आपली जबाबदारी असल्याची भावना प्रत्येक कार्यकर्त्यांने जाणली पाहिजे.”
mp bapat
या वेळी नायब तहसीलदार प्रज्ञा काकडे, जिज्ञा जोशी, इंदूबाई हिंगमीरे, प्रतिभा शिंदे, अ‍ॅड मनीषा फणसाळकर यांचा सत्कार खा. बापट यांच्या हस्ते झाला. या वेळी उपमहापौर सरस्वती शेंडगे, कसबा मतदारसंघाचे अध्यक्ष प्रमोद कोंढरे, नगरसेवक राजेश येनपुरे, अजय खेडेकर, गायत्री खडके, राजू परदेशी, मामा देशमुख आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आयोजन कसबा महिला आघाडी अध्यक्ष वैशाली नाईक व सर्व महिला पदाधिकाऱ्यांनी केले.