भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या ‘त्या’ गुन्हेगाराने रचला होता माझ्या हत्येचा कट : अनिल गोटे 

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईन – धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपाविरोधात बंड पुकारणारे आमदार अनिल गोटे यांनी बुधवारी धक्कादायक खुलासा केला आहे. ‘माझ्या हत्येचा कट रचण्यात आला होता. भाजपमध्ये नुकताच  प्रवेश केलेल्या एका गुन्हेगाराने आपल्या पत्नीविषयी अश्लाघ्य भाषेत मजकूर लिहून तो सोशल मीडियावर पसरवल्याचा आरोपही अनिल गोटे यांनी विधानसभेत केला. मोबाइलवर आलेल्या एका ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून अनिल गोटे यांनी विधानसभेत सांगितले.
देशी कट्ट्यातून धरला होता नेम…
धुळे जिल्ह्यातील अवधान गावात भाषण करत असताना माझ्यावर देशी कट्ट्यातून नेम धरला होता, पण एका अज्ञात डॉक्टरने कट्टा हिसकावून घेतल्याने माझे प्राण थोडक्यात बचावल्याचे आमदार अनिल गोटे यांनी सांगितले. याबाबत धुळेच्या पोलिस अधीक्षकांना पत्र पाठवूनही अद्याप कारवाई झाली नाही.दरम्यान, नाणार प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसाठी विधानसभेच्या प्रेक्षक गॅलरीत चार जणांची घोषणाबाजी केली. सभागृहात गोंधळ घातला. दोन महिलांसह चौघांना सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेतले आहे. नितेश राणेंकडून नाणार प्रकल्प रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.
भाजपात दुफळी : अनिल गोटेंकडून नवीन पक्षाची घोषणा
धुळे मनपा निवडणुकीपूर्वीच  भाजपात दुफळी पडली आहे. धुळ्याचे भाजप आमदार अनिल गोटे यांच्याकडून नव्या पक्षाची स्थापना करण्याची घोषणा करण्यात आली आहे. भाजपकडून दगाफटका झाल्याने निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगतले आहे. अनिल गोटेंची पत्नी  हेमा या महापौर पदाच्या उमेदवार असणार आहेत.धुळे महापालिकेची निवडणूक येत्या ९ डिसेंबरला होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर गोटे यांचे मंत्री सुभाष भामरे यांच्याशी वाद सुरु होते. यामुळे गोटे यांनी आक्षेप घेतलेला व राजीनामा देण्याची घोषणा केली होती. रविवारी गोटे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेत आपले आक्षेप मांडले होते .
धुळे येथे प्रदेशाध्यक्षांसमोर गोटे समर्थकांचा गोंधळ –
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी रात्री प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन आदींच्या उपस्थितीत झालेल्या भाजपच्या विजयी संकल्प मेळाव्यात आमदार अनिल गोटे यांना भाषण करण्यास मज्जाव करण्यात आल्याने गोंधळ उडाला होता. या गोंधळामुळे गोटे यांना न बोलताच मेळाव्यातून बाहेर पडावे लागले होते.