दगडफेकीत पोलीस निरीक्षक जखमी

अर्धापूर (नांदेड) : पोलीसनामा ऑनलाईन – नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील दाभड येथे एका इंग्लिश स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम सुरु होता. यावेळी शेजारी बांधकाम सुरु असल्याने मंदिराच्या छतावरील माती कार्यक्रमाच्या ठिकाणी पडली. यामुळे गैरसमज होऊन दलीत-सवर्णांमध्ये वाद सुरु झाला. हा वाद मिटविण्यासाठी गेलेले पोलीस निरीक्षक विष्णूकांत गुट्टे यांना दगड लागल्याने जखमी झाले. ही घटना शनिवारी (दि.२) दाभड गावातील मारूती मंदिराच्या पटांगणात रात्रीच्या सुमारास घडली.

ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलचाना कार्यक्रम गावातील बांधकाम सुरु असलेल्या मारूती मंदीराच्या पटांगणात सुरु होता. या कार्यक्रमाला काही मंडळी मंदिराच्या छतावर बसली होती. कार्यक्रम सुरु असताना मंदिरावरील माती खाली पडली. ही माती जाणूनबुजून टाकली असल्याचा समज झाला. त्यामुळे दलीत-सवर्णात वाद सुरु झाला. या वादातून एकमेकांवर दगडफेक सुरु झाली. त्यावेळी हा वाद सोडविण्यासाठी गेलेले अर्धापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरक्षक गुट्टे यांच्या कपाळवर दगड लागला. यामध्ये ते जखमी झाले.

ही माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधिक्षक संजय जाधव, अतिरिक्त पोलीस अधिकारी मंगेश शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब देशमुख, स.पो.नि महादेव मांजरमकर यांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली. शांतता प्रस्थापित करीत असतांना सरकारी कामात अडथळा केला म्हणून पोलीस निरीक्षक विष्णूकांत गुट्टे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन दोन्ही समाजाच्या २० ते २५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. पुढील पोलीस उपनिरिक्षक दिगंबर जामोदकर हे करीत आहेत.