Instagram Threads ने केले अप्रतिम अपडेट, आता कुणालाही पाठवू शकता मॅसेज

नवी दिल्ली : इन्स्टाग्राम आपल्या यूजर्ससाठी सातत्याने अपडेट करत आहे. यापूर्वी इन्स्टाग्रामने आपल्या रील्समध्ये अपडेट करून यूजर्सला टिकटॉकचा ऑपशन दिला होता. आता इन्स्टाग्राम थ्रेड्समध्ये अपडेट करून यूजर्सना मॅसेज करण्याची सुविधा दिली आहे.

यापूर्वी इन्स्टाग्राम यूजर्स थ्रेड्सद्वारे त्याच लोकांना मॅसेज करता येत होता, जे क्लोज फ्रेन्ड्स लिस्टमध्ये असायचे, परंतु आता इन्स्टाग्राम थ्रेड्सने जे अपडेट केले आहे, त्यानंतर इन्स्टाग्राम यूजर्स विना थ्रेड्स डाऊनलोड करता इन्स्टाग्रामवरील सर्व लोकांना मॅसेज पाठवू शकतात.

अपडेट व्हर्जन असे वापरा
इन्स्टाग्रामने थ्रेड्समध्ये जे बदल केले आहेत, त्याच्यानंतर यूजर्स इन्स्टाग्रामवर कुणाशीही बोलू शकतात. लेटेस्ट अपडेटसह, थ्रेड्स तुम्हाला इन्बॉक्समध्ये दोन टॅब देते, एक टॅब जवळच्या मित्रांसाठी आणि दूसरा टॅब इन्स्टाग्रामवरील सर्व लोकांसाठी आहे, जरी त्यांनी थ्रेड डाऊनलोड केले असेल किंवा नसेल. मात्र, लेटेस्ट अपडेटनंतर सुद्धा तुमचे ऑटोमॅटिक स्टेटस अपडेट्स केवळ तुमचे क्लोज फ्रेंड्सच पाहू शकतील. हे अपडेट अँड्रॉईड आणि आयओएस दोन्ही डिव्हाईससाठी रोलआउट करण्यात आले आहे.

ही माहिती अगोदर कुणाला मिळाली
इन्स्टाग्राम थ्रेड्स अपडेटची माहिती सर्वप्रथम टिप्सटर जेन मांचून वोंग यांनी जाहीर केली होती. त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवर इन्स्टाग्रामच्या नव्या फिचरचा स्क्रीनशॉट शेयर केला आहे. ज्यामध्ये दिसत आहे की, अपडेटनंतर सुद्धा क्लोज फ्रेंड्ससोबत केलेल्या चॅटला इन्बॉक्समध्ये सुद्धा प्राथमिकता दिली आहे. थ्रेड्समध्ये बाय डिफॉल्ट नोटिफिकेशन केवळ क्लोज फ्रेंड्ससाठीच अनेबल करण्यात आले आहे, परंतु अ‍ॅपमध्ये सेटिंग्ज बदलता येऊ शकते.

इन्स्टाग्रामने थ्रेड्स मागच्या वर्षी लाँच केले होते, ज्यामध्ये यूजर्स त्या लोकांशी चॅट करू शकतात, ज्यांना त्यांनी इन्स्टाग्रामवर क्लोज फ्रेंड्सम्हणून मार्क केले आहे. इमेज सेंट्रिक मॅसेजिंग अ‍ॅप यूजर्सना ऑन द मूव्ह, आऊट अँड अबाऊट आणि लो बॅटरीसारखे ऑटोमॅटिक स्टेटस अपडेट करण्याची सुद्धा सुविधा देते.

अजूनही क्लोज फ्रेंड्सकडे बेनिफिट
इन्स्टाग्रामने थ्रेड्समध्ये झालेल्या अपडेटनंतर सुद्धा क्लोज फ्रेंड्सलाच बेनिफिट राहील. कारण थ्रेड्स तुम्हाला ताबडतोब आपल्या क्लोज फ्रेंड्सला फोटो आणि व्हिडिओ पाठवण्याची सुविधा देते, परंतु आता तुमच्या इन्स्टाग्रामवरील कुणीही यूजर सहजपणे तुमच्याशी संवाद साधू शकतो. परंतु, हा इन्टरफेस एकदम पहिल्यासारखाच दिसत आहे. अपडेट चेंजलॉगमध्ये उल्लेख करण्यात आला आहे की, मॅसेज, स्टेटस आणि स्टोरीजमध्ये प्राथमिकता अजूनही क्लोज फ्रेंड्सचीच असेल.

इन्स्टाग्राम ही फेसबुकचीच कंपनी आहे, ज्यामुळे फेसबुकने आपल्या दोन महत्वाच्या सर्व्हिस इन्स्टाग्राम आणि मसेंजरला मर्ज केले होते. या मर्जरनंतर आता मॅसेंजर यूजर थेट इन्स्टाग्राम यूजरना मॅसेज पाठवू शकतात.