कोरड्या खोकल्यावर ‘हे’ 4 घरगुती उपाय प्रभावी, जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाईन : कोरड्या खोकल्यामध्ये घसा कोरडा पडून सतत खोकला येत राहतो. सतत येणाऱ्या या खोकल्यामुळे पोट आणि बरगड्यांमध्ये तीव्र वेदना होतात. या वेदनांपासून व खोकल्यापासून सुटका करण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत –

उपाय –

१) मध
नियमित सकाळी रोज एक चमचा मध सेवन करा. किंवा कोमट पाण्यामध्ये मध टाकून नियमितपणे प्या.

२) हळद, सुंठ आणि गूळ
हळद, सुंठ आणि गूळ मिक्स करून त्याच्या लहान आकाराच्या गोळ्या बनवून ठेवा आणि साधारण एक किंवा दोन तासाने ही गोळी खा.

३) ज्येष्ठमधाचा चहा
कपभर पाण्यामध्ये दोन मोठे चमचे ज्येष्ठमधाची पावडर उकळत ठेवा. १० ते १५ मिनिटे पाणी उकळू द्या. हा चहा दिवसातून जास्तीतजास्त दोन वेळा घ्यावा.

४) खडीसाखर
खडीसाखर चघळत राहिल्यानेदेखील कोरडा खोकला बरा होण्यास मदत होते.