हृदयाबद्दल ‘या’ 4 इंटरेस्टींग गोष्टी क्वचितच तुम्हाला माहिती असतील ! वाचून चकित व्हाल

पोलीसनामा ऑनलाइन – आज आपण हृदयाबद्दल काही गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या क्वचितच तुम्हाला माहित असतील. जर तुम्हाला या गोष्टी समजल्या तर तुम्ही योग्य प्रकारे काळजी घेऊ शकता आणि हृदय चांगलं ठेवू शकता.

1) हृदयाचे ठोके किती वेळा पडतात ?
मानवी हृदयात 4 चेंबर असतात. त्यावर 4 वॉल्व असतात. हेच वॉल उघडून बंद होत असतात. याचीच उघडझाप होताना हृदयाच्या ठोक्यांचा आवाज येत असतो. एका मिनिटात हृदयाचे 72 ठोके पडत असतात. दैनंदिन जीवनात एका दिवसात 1 लाखांपेक्षा जास्त वेळा हृदयाचे ठोके पडतात.

2) किती ब्लड पंप होतं ?
तुम्हाला कदाचित हे खोटं वाटेल परंतु तुमचं हृदय तुमची शारीरिक क्षमता लक्षात घेऊन एका मिनिटात तब्बल 3 ते 5 लिटर ब्लड पंप करत असतं. एका दिवसाला तब्बल 7500 लिटरहून अधिक ब्लड हृदयाकडून पंप केलं जातं. यामुळंच तर आपण जिवंत असतो. रक्तात पोषक घटक असतात यात ऑक्सिजनही मिसळला जातो आणि हेच रक्त सेल्सकडे पाठवलं जातं. सेल्सकडे गेल्यानंतर उरलेले घटक किडनीकडे पाठवले जातात जिथं रक्त फिल्टर केलं जातं.

3) हृदय एकटंही राहू शकतं जिवंत
जर तुमचं हृदय वेगळं केलं तरी तुमचं हृदय जिवंत राहतं आणि त्याचे ठोके सुरूच राहतात. जगातील सर्वाधिक लोक हे कार्डिओव्हॅस्क्युलर आजारांनी मरतात जास्त संख्या ही हार्ट अटॅकनं मृत्यू पावलेल्यांची असते. साधारणपणे वयस्कर व्यक्तींच्या हृदयाचं वजन हे 250 ते 350 ग्रॅम इतकं असतं तर काही केसेसमध्ये हे 500 ग्रॅमही असू शकतं.

4) हसणं हृदयासाठी चांगलं
हसणं हा हृदयासाठी एक प्रकारचा व्यायाम आहे. एक रिसर्च असं सांगतो जेव्हा आपण हसतो तेव्हा शरीरातील रक्तप्रवाह हा 20 टक्क्यांनी वाढतो. मुख्य म्हणजे हसल्यामुळं ताण तणाव कमी होतो. परिणामी रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते.