Maharashtra Budget 2019 : दुष्काळासाठी ‘एवढ्या’ कोटींची तरतूद 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचा सन २०१९-२०चा अंतरिम अर्थसंकल्प आज दुपारी २ वाजता विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत सादर करण्यास सुरुवात झाली आहे. अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत तर अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेच्या सभागृहात अर्थसंकल्प मांडला. आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन तीन महिन्यांसाठी लेखानुदान मंजूर करण्यासाठी सध्या मुंबईत विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे.
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्थसंकल्प शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून मांडण्यात येणार असून राज्याची आर्थिक स्थिती उत्तम आहे. हा अर्थसंकल्प जुलै महिन्यात सादर होणाऱ्या मुख्य अर्थसंकल्पाची दिशा असेल. आज ४ महिन्यांच्या खर्चाचे लेखानुदान सादर केले जात आहे.

या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी विविध योजना जाहीर केल्या आहेत. तसेच दुष्काळासाठी २००० कोटी आकस्मिक निधीची तरतूद मंजूर केली आहे. लोकसभा निवडणूक वर्षात अंतरिम अर्थसंकल्प मांडणारे मुनगंटीवार हे चौथे वित्तमंत्री आहेत. याआधी जयंत पाटील (२००४), दिलीप वळसे-पाटील (२००९) आणि अजित पवार (२०१४) यांनी वित्तमंत्री या नात्याने अंतरिम अर्थसंकल्प मांडला होता.

अर्थसंकल्पामधील ठळक मुद्दे –
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या भाषणातील मुख्य मुद्दे –
– शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा स्रोत वाढवा हा शासनाचा प्रयत्न.
– दुष्काळासाठी २००० कोटी आकस्मिक निधीची तरतूद.
– गाळ काढून सिंचन व्यवस्था दुरुस्त करण्यासाठी १ हजार ५०० कोटीची तरतुद.
– जलसंपदा खात्यासाठी ८ हजार ७३३ कोटी रुपयांची तरतूद.
– पाणी टंचाईवर उपाय म्हणून पाणी पुरवठ्यासाठी ५३० कोटी वितरित करण्यात आली.
– केंद्राने विक्रमी ४ हजार ७१४ कोटी रुपयांची रक्कम मंजूर केली आहे.
– धान उत्पादन बोनस दुप्पट करणार त्यासाठी ५०० कोटी रुपयाची तरतूद.
– शिवडी नाव्हा-शेवा सिलिंकचे काम प्रगतीपथावर आहे. नागपूर, पुणे मेट्रोची कामे प्रगतीपथावर आहेत. नवी मुंबई विमानतळाच्या कामालाही सुरुवात.
– गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण घटले, १५१ तालुक्यात दुष्काळ, २६८ महसूल मंडळात दुष्काळ घोषित केला आहे.
– ४ वर्षात या सरकारने १३ हजार किलोमीटर एवढ्या लांबीचे रस्ते केले. २०१४ ला केवळ ४ हजार ७६६ किलोमीटर एवढे होते.
– गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेत शेतकऱ्यांसह, शेतमजुरांचा समावेश करण्यात येणार आहे.
– राज्याच्या तिजोरीवर पहिला हक्क शेतकरी आणि नंतर गरिबांचा आहे.
– छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, फुले, शाहू महाराज यांचे स्मरण करत अर्थसंकल्प लेखानुदान सादर.
अर्थराज्यमंत्री दिपक केसरकर यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे –
– शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट वाढवण्यासाठी आम्ही शाश्वत शेतीवर भर.
– इतर राज्यांच्या तुलनेत केंद्राकडून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सर्वाधिक निधी मिळत आहे.
– कौशल्य विकास कार्यक्रम राबवून  तरुणांना स्वयंरोजगाराच्या चालना देण्यात येत आहे.
– राज्य सरकारने स्वयंरोजगाराच्या निर्मितीचे दालन केले आहे.
– एसटीला नवीन बसेस खरेदी करण्यासाठी व बसस्थानके सुधारण्यासाठी निधी.
– मॅग्नेटिक महाराष्ट्र आणि मेक इन इंडियाद्वारे १२ लाख कोटींचे करार करण्यात आले आहेत.
– आम्ही मुंबई मेट्रोचे जाळे २७६ किमीपर्यंत विस्तारित करत आहोत.
– नवीन, अपारंपरिक ऊर्जा निर्मितीसाठी १ हजार १८७ कोटी.
– बस स्थानकांसाठी १०१ कोटी. नवीन बस खरेदीसाठी ९० कोटी.
– उपनगरीय लोकल सेवेसाठी ५५ हजार कोटी रुपयांचे प्रकल्प हाती घेतले आहेत.
– नाबार्ड विकास योजनेसाठी ३५० कोटी रुपये
– १४ पर्यंतच्या शाळांना अनुदानाचा पहिला टप्पा आम्ही मागे दिला. आता पुढील टप्पा अनुदान देण्यासाठी सकारात्मक विचार करत आहोत.
– १५ ते ४५ वयोगटातील तरुणांना प्रमोद महाजन कौशल्य विकास अभियान राबण्यासाठी ९० कोटींची तरतूद.
– पायाभूत सुविधा हा आमच्यासाठी महत्त्वाचा विषय राहिला आहे.
– वीज निर्मितीसाठी पायाभूत आराखडा योजनेला महत्त्व देण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या –

भारताची दोन विमानं पाडली, एक वैमानिक ताब्यात, पाकचा दावा

काल घुसून मारलं अन् आज तोंड फोडलं ; Airstrike भारतानं पाकिस्तानचं F-16 विमान पाडलं 

पाकिस्तानी विमानं भारतीय हद्दीत शिरली ; बाॅम्ब टाकल्याची शक्यता ? 

धक्कादायक… #AirStrike नंतर भारतीय वायुदलाच्या ‘त्या’ विंग कमांडरची आत्महत्या 

भारताची 2 विमानं पाडली, 1 वैमानिक ताब्यात, पाकचा दावा