Intermittent Fasting मुळे होऊ शकतो अकाली मृत्यू! रिसर्चमध्ये धक्कादायक खुलासा

नवी दिल्ली : सध्या वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी इंटरमिटेंट फास्टिंगची (Intermittent Fasting ) खूप क्रेझ आहे. बॉलीवूड सेलिब्रिटींपासून (Bollywood Celebrities) ते सामान्य लोक वजन कमी करण्यासाठी हा डाएट फॉलो करत आहेत. (Intermittent Fasting)

आता अमेरिकन संशोधकांनी दावा केला आहे की, इंटरमिटेंट फास्टिंगमुळे अकाली मृत्यूचा धोका वाढतो. नवीन संशोधनात म्हटले आहे की दिवसभरात तीन वेळा खाण्याच्या तुलनेत एकदाच जेवण केल्याने मृत्यूचा धोका ३०% वाढतो (Side effects of intermittent fasting).

संशोधकांनी म्हटले की, वेळेवर नाश्ता न केल्याने हृदयविकाराची (Heart Disease) उच्च जोखिम आढळून आली, तर दुपारचे जेवण किंवा नाश्ता वगळल्याने मृत्यूचा धोका जास्त असतो. संशोधकांचा दावा आहे की लोकांनी व्यायाम (Exercise) केला, सकस आहार घेतला आणि कधीही धूम्रपान केले नाही तरी वजन कमी होऊ शकते. पण दोन जेवणात जास्त अंतर ठेवणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

एकदाच जास्त खाल्ल्याने धोका
संशोधकांनी सांगितले की फास्टिंग करणारे लोक सहसा एकाच वेळी तुलनेने मोठ्या प्रमाणात अन्न खातात, ज्यामुळे कालांतराने शरीरातील पेशींचे नुकसान होते. टेनेसी विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या या नवीन अभ्यासात असे दिसून आले आहे की दिवसातून तीन वेळा जेवण करणे हा सर्वोत्तम मार्ग आहे, परंतु संशोधनात असे दिसून आले आहे की दोन जेवणातील अंतर खुपच कमी असेल तरी देखील अकाली मृत्यूचा धोका वाढतो. जास्त प्रमाणात खाल्ल्याने शरीराच्या पचनसंस्थेवर दबाव वाढतो. (Intermittent Fasting)

काय होता संशोधनाचा निष्कर्ष?
संशोधनात ४० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सुमारे २४,००० लोकांचा समावेश करण्यात आला.
त्यांच्यावर १५ वर्षे लक्ष ठेवण्यात आले. जर्नल ऑफ न्यूट्रिशन अँड डायबिटीजमध्ये प्रकाशित संशोधनानुसार,
दिवसातून तीन वेळा जेवण घेणाऱ्या सहभागींच्या तुलनेत दिवसातून एकदाच जेवण करणाऱ्यांमध्ये मृत्यूचा धोका ३०
टक्के जास्त होता. अशा लोकांना हृदयविकाराने मृत्यू होण्याचा धोका ८३ टक्क्यांनी वाढला होता.
नाश्ता करणाऱ्यांच्या तुलनेत, नाश्ता न करणाऱ्यांमध्ये हृदयविकारामुळे मृत्यूचा धोका ४० टक्क्यांनी जास्त असल्याचे आढळून आले. मात्र, ज्यांनी दुपारचे किंवा रात्रीचे जेवण केले नाही त्यांच्या मृत्यूची शक्यता १२ ते १६% जास्त होती.

म्हणजे काय इंटरमिटेंट फास्टिंग?
इंटरमिटेंट फास्टिंगमध्ये एका ठराविक वेळेतच खावे लागते. यामध्ये कॅलरी मोजल्या जात नाहीत तर वेळ मोजला जातो.
इंटरमिटेंट फास्टिंग एक असा डाएट आहे, ज्यात दीर्घकाळ उपाशी राहावे लागते.
तसेच अन्न कोणत्या वेळी खावे आणि कोणत्या वेळी नाही, हे सर्व सर्वप्रथम ठरवले जाते.
उदाहरणार्थ, काही लोक त्यांचे जेवण १२ तासांच्या आत घेतात, तर काही लोक १४ तासांनंतरच खातात.
असे केल्याने वजन कमी करणे सोपे होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime News | पुण्यातील सिंहगड रोड परिसरात खून; प्रचंड खळबळ