बॉलिवूडमधील ‘हे’ टॉप ५ कलाकार ‘नशेखोर’, नंतर केली स्वतःची व्यसनापासून सुटका

मुंबई : वृत्तसंस्था –  २६ जून हा दिवस संयुक्त राष्ट्रांद्वारा ड्रग्सचा दुरुपयोग (Drug Abuse) आणि अवैध तस्करी (Illicit Trafficking) विरोधी आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केला जातो. याचा हेतू तरुणांचे संरक्षण करणे आणि मानव जातीच्या कल्याणाला प्रेरणा देणे हा आहे. ड्रग्सचे सेवन करण्याचे व्यसन एक सामाजिक आणि मनोवैज्ञानिक समस्या आहे जी पूर्ण जगातील तरुणांवर परिणाम करते. या व्यसनामुळे तरुण पिढी आपले करिअर बरबाद करून घेते. बॉलिवूडमध्येही असे काही सेलिब्रिटी आहेत ज्यांना नशा करण्याचं व्यसन होतं परंतु ते आता त्यापासून दूर आहेत. एक चांगलं आयुष्य ते जगत आहेत. यातील एक नाव म्हणजे मीना कुमारी मात्र आात या जगात नाहीत.

१) संजय दत्त- २९ जुलै १९५९ रोजी संजय दत्तचा जन्म झाल्यानंतर, महान अदाकारा नरगिस यांनी कधीच विचार केला नसेल की, त्यांच्या मुलाला आयुष्यभर अशा वेड्या-वाकड्या रस्त्यावरून जावे लागेल. सुनील दत्त यांनी अनेकदा सांगितले होते की, एकदा काश्मीरमध्ये त्यांनी गंमतीने संजूकडे सिगारेट दिली. त्यानंतर त्याने पूर्ण सिगारेट पिऊन टाकली हे पाहून तर सुनील दत्त चकितच झाले होते. हळूहळू त्याला ड्रग्सचं व्यसन लागलं. संजूचे ड्रग्सचे व्यसन घालवण्यासाठी सुनील दत्त यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली. सुनील दत्त संजूला अमेरिकेतील नशा उन्मूलन केंद्रात घेऊन गेले तेथे उपचार घेतल्यानंतर संजय दत्तने ड्रग्सला गुड बाय केले आणि पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये कामाला सुरुवात केली.
image.png
२) प्रतीक बब्बर- स्मिता पाटील आणि राज बब्बर यांचा मुलगा प्रतीक बब्बर वयाच्या १२ वर्षांपासून ड्रग्स घेऊ लागला होता. आता उपचार घेतल्यानंतर मात्र प्रतीक बब्बर या व्यसनापासून पूर्णपणे मुक्त झाला आहे. आपले आयुष्य आनंदाने जगत आहे.
image.png
३) धर्मेंद्र- बॉलिवूडचा हीमॅन म्हणजेच धर्मेंद्र यांनी यमला पगला दीवाना २ या सिनेमाच्या प्रमोशनवेळी सांगितले होते की, ड्रग्समुळे त्यांचे करिअर कसे बरबाद झाले होते. धर्मेंद्र नेहमीच ओवरलिमिट दारूचं सेवन करत असत. परंतु २०११मध्ये त्यांनी आपल्या स्वास्थ्याची चिंता करत या वाईट सवयीपासून स्वत:ची सुटका केली.
image.png
४) मीना कुमारी- मीना कुमारी यांच्या सिनेमांपेक्षा त्यांच्या पर्सनल लाईफमुळेच जास्त चर्चेत राहिल्या आहेत. असे म्हटले जात आहे की, आपल्या करिअरमध्ये यश आणि प्रसिद्धी मिळवल्यानंतर आणि कमाल अमरोही सोबत घटस्फोट झाल्यानंतर मीना कुमारी यांना दारुचं व्यसन लागलं होतं. दारू पिणे आणि तंबाखू खाण्याच्या व्यसनाने मीना कुमारी यांच्या स्वास्थ्यावर इतका वाईट परिणाम झाला की, त्यातून बाहेर पडणं मीना कुमारी यांना अशक्य झालं. त्यांनी काही दिवसांनी जगाचा निरोप घेतला.
image.png
५) कपिल शर्मा- एका मुलाखतीत बोलताना कपिल शर्माने आपल्या तणावाला स्विकारत सांगितले होते की, “माझ्याबद्दल अशा अनेक वाईट गोष्टी बोलल्या गेल्या ज्याच्यामुळे माझे मन दुखावले गेले. जेव्हा या गोष्टींसोबत लढू शकलो नाही तेव्हा मी दारू पिऊ लागलो. सध्या कपिल आपल्या वाईट काळातून बाहेर आला आहे. सध्या तो आपल्या शोवर फोकस्ड आहे.
image.png

आरोग्यविषयक वृत्त – 

WHO ने सांगितलं एंटिबायोटिकचा वापर कसा करायचा

फुप्फुसांचा संसर्ग ठरू शकतो घातक, वेळीच ओळखा लक्षणे

खोबरेल तेल वापरा आणि डोळ्याखालची काळी वर्तुळे घालवा

‘या’ ट्रिक्स फॉलो केल्यास ऑफिसमध्ये तुम्हाला कधीच बोअर होणार नाही