‘योग’ दिवसाच्या माध्यमातून निवडणुक येवु लागलेल्या राज्यांवर ‘फोकस’, PM मोदी रांचीमध्ये तर HM शाह रोहतकमध्ये देणार ‘दस्तक’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – भाजपसाठी यंदाचा आंतरराष्ट्रीय योगा दिवस राजकीयदृष्या मोठा महत्वाचा आहे, कारण याचं योगा दिवसाचे निमित्त साधून भाजप होऊ घातलेल्या राज्यांच्या विधानसभेवर फोकस करु पाहत आहे. यामुळे शुक्रवारी होणाऱ्या योगा दिवसाला नरेंद्र मोदी रांची तर केंद्रीय ग्रहमंत्री अमित शाह हरियाणाच्या रोहतकमधील योग शिबिरात सहभागी होणार आहे. पुढील 3 महिन्याने हरियाणा, झारखंड आणि महाराष्ट्रात विधानसभांच्या निवडणूका पार पडणार आहेत. त्यामुळे म्हणले जात आहे की भाजपचे हे दोन नेते विधानसभा होऊ घातलेल्या राज्यात योगाच्या माध्यमातून उतरुन राजकीय हित साधण्याच्या तयारीत आहेत.

झारखंडमध्ये मोदी –
पंतप्रधान मोदी शुक्रवारी रांचीत होणाऱ्या 5 व्या आंतरराष्ट्रीय योगा दिवसाच्या शिबिरात सहभागी होणार आहेत. यावेळी रांचीच्या प्रभात तारा मैदानावर सकाळी 6 वाजता 50 हजार पेक्षा आधिक लोक सहभागी होतील.पंतप्रधान मोदी समवेत झारखंडचे मुख्यमंत्री रघूवर दास देखील सहभागी होऊन राजकीय समीकरण साधण्याचा प्रयत्न करतील.

लोकसभा निवडणूकीत अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर आता भाजपने राज्यांच्या विधानसभा निवडणूककडे मोर्चा वळवला आहे. त्यामुळे योगा दिवसाचे निमित्त साधून झारखंडमध्ये राजकीय समीकरणे जुळण्याचा मोदींचा प्रयत्न आहे. भाजपने झारखंडच्या निवडणूकीत 65 पेक्षा आधिक जागा मिळवण्याचे लक्ष ठेवले आहे. भाजपला झारखंड जिंकण्यासाठी मोदींचा चेहरा आणि केंद्र सरकारच्या योजना लोकांपर्यत पोहचवायच्या आहेत. 2014 ला झारखंडच्या निवडणूकीत भाजपने 81 जागांपैकी 37 जागा जिंकल्या होत्या. परंतू आता आत्मविश्वास वाढल्याने भाजपला आता जास्त जागा मिळवायच्या आहेत. त्यासाठी भाजप प्रयत्न करत आहे.

हरियाणात अमित शाह –
केंद्रीय मंत्री अमित शाह हे योगा शिबिरात सहभागी होण्यासाठी हरियाणाच्या रोहतकमध्ये जाणार आहे, याच निमित्त येणाऱ्या निवडणूकांसाठी ते हरियाणासाठी काही मोठ्या घोषणा देखील करु शकतात. ज्याचा विधानसभेला भाजपला लाभ होईल.लोकसभा निवडणूकीतील हरियाणात भाजपने सर्व 10 जागा जिंकल्याने भाजपमध्ये हरियाणात उत्साह आहे. भाजपला जाट बहुल ग्रामीण भागातील बरीच मते मिळाली. त्यामुळे आत्मविश्वास वाढलेल्या भाजपने 90 पैकी 75 पेक्षा आधिक जिंकण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे भाजपने आता बिगर जाट मताशिवाय जाट समुदायाला आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

आरोग्यविषयक वृत्त

हे उपाय करा आणि ” मणक्याच्या आजाराला ” पळवून लावा

मधुमेह, मानसिक आजार आणि हृद्यरोगाला दूर ठेवण्यासाठी करा हे “प्राणायम”

“केळी” आरोग्यासाठी उपयुक्त

उद्यापासून योगा करण्याचा संकल्प करणार असाल तर या “आसनांपासून” करा सुरुवात

ह्रदयाची घ्या अशी काळजी , कधीही होणार नाहीत ब्लॉकेजेस …!

प्रदूषणापासून करा ” केसांचा ” बचाव

सिने जगत

‘द स्काई इज पिंक’ मधून बॉलीवुडमध्ये प्रियंका चोप्रा करणार ‘कमबॅक’, पहिला ‘लुक’ व्हायरल

‘बिग बॉस’ ने दिला ‘डान्स इंडिया डान्स’ला झटका, करिना कपूरचा शो सुरु होण्याआधीच ‘अडचणीत’