नीरवचा भाऊ ‘नेहल मोदी’ विरोधात इंटरपोलची ‘रेड कॉर्नर’ नोटीस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बँकांची फसवणूक करुन परदेशात पळून गेलेला फरार नीरव मोदी याचा भाऊ नेहल मोदी याच्याविरुद्ध इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे.

नेहल दीपक मोदी याच्या शोधासाठी आणि त्याला अटक करण्यासाठी ही नोटीस जारी केली आहे.
बँकांची २ अब्ज डॉलर्सची फसवणुक केल्याप्रकरणी नीरव मोदी याच्यावर गुन्हा दाखल झाला असून सध्या तो लंडनच्या तुरुंगात आहे. या प्रकरणात त्याचा भाऊ नेहल मोदी याचाही हात आहे. मात्र, तो आतापर्यंत कोठेच आढळून आलेला नाही. त्यामुळे ही नोटीस जारी करण्यात आली आहे.

नीरव मोदी याची न्यायालयीन कोठडी १९ सप्टेंबरपर्यंत आहे. त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे न्यायालयापुढे सादर करण्यात येईल. त्याच्या न्यायालयीन कोठडीत वाढ होण्याची शक्यता आहे.

आरोग्यविषयक वृत्त –