LIC : दररोज 160 रुपये भरा अन् 23 लाख मिळवा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपला पैसा सुरक्षित ठिकाणी गुंतवला जावा आणि त्यातून चांगला परतावा मिळावा या उद्देशाने अनेकजण एलआयसीला LIC प्राधान्य देतात. सध्या जर तुम्हीही गुंतवणूक करू इच्छित असाल आणि एलआयसीच्या एखाद्या LIC च्या शोधात असाल, तर न्यू मनीबॅक पॉलिसी तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकते. या प्लॅनमध्ये जर तुम्ही 25 वर्षांपर्यंत दररोज 160 रुपये गुंतवणूक केल्यास 25 वर्षांनंतर तुम्हाला 23 लाख रुपये मिळतील.

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात तेजी, जाणून घ्या आजचे नवे दर

LIC ची न्यू मनीबॅक पॉलिसी एक प्रकारे नॉन लिंक्ड लाईफ इन्शोरन्स पॉलिसी आहे. जी गॅरेंटी रिटर्न आणि बोनस देते. या प्लॅनची विशेष बाब म्हणजे यात विमाधारकाला प्रत्येक 5 वर्षाला मनीबॅक, मॅच्योरिटीवेळी चांगले रिटर्न तसेच टॅक्स इन्शोरन्स बेनिफिटही मिळणार आहे. तसेच ही पॉलिसी पूर्णपणे टॅक्स फ्री पॉलिसी आहे. त्याशिवाय याच्या व्याजावर, प्रीमियम पेमेंट आणि मॅच्योरिटीवेळी मिळणाऱ्या रकमेवर कोणताही टॅक्स लागणार नाही. या प्लॅनमध्ये जर तुम्ही 25 वर्षांपर्यंत दररोज 160 रुपये गुंतवल्यास 25 वर्षांनंतर तुम्हाला 23 लाख रुपये मिळतील. LIC ने दिलेल्या माहितीनुसार, हा प्लॅन 13 वर्षांपासून ते 50 वर्षांपर्यंतचा कोणताही व्यक्तीला घेता येणार आहे. या प्लॅनमध्ये दर 5 वर्षांनी म्हणजेच 5 व्या वर्षी, 10 व्या वर्षी, 15 व्या वर्षी आणि 20 व्या वर्षी 15 ते 20 टक्के मनीबॅक मिळेल. परंतु हे त्याचवेळी होईल, ज्यावेळी प्रीमियमची कमीत-कमी 10 टक्के रक्कम जमा होईल. त्याशिवाय, मॅच्योरिटीवर गुंतवणुकदारांना बोनस दिला जाणार आहे. एकूण 10 लाख रुपयांच्या या प्लॅनमध्ये अ‍ॅक्सिडेंटल डेथचाही कव्हर मिळणार आहे.

Also Read This : 

मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन, बॉम्बशोधक पथक दाखल; तपास सुरु

लैंगिक संबंध ठेवल्यानंतर कशी आणि किती दिवसात गर्भधारणा होते ? जाणून घ्या

ब्लॅक, व्हाईट फंगसनंतर भारतात अ‍ॅस्परगिलोसिसची प्रकरणे आली समोर; जाणून घ्या लक्षणं, कारणे आणि बचावाचे उपाय

शिवसेनेचे पदाधिकारी एकनाथ पाटील यांचे स्पष्टीकरण, म्हणाले – ‘… तो Video 2 वर्षांपूर्वीचा, भाजपाने घरगुती वादाचा गैरफायदा घेऊ नये’