‘आम्ही अस्वस्थ आहोत, राज्य सरकारला देखील काही अधिकारी आहेत’ ! बैठकीनंतर शरद पवारांचं सूचक वक्तव्य

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाली. यात पुढच्या कामाची दिशाही ठरवण्यात आली. आम्ही अस्वस्थ आहोत गेले अनेक दिवस नक्षलवाद्यांच्या नावाखाली अटक केली जात आहे. हे योग्य नाही असं वक्तव्य शरद पवार यांनी बैठकीनंतर केलं.

शरद पवार म्हणाले, “आम्ही या प्रकरणाचा आढवा घेतला. या प्रकरणाची चौकशी NIA करत आहे. परंतु या सरकारलाही काही अधिकार आहेत. त्या अनुषंगानं काय करता येईल याबाबत तज्ज्ञांची मतं जाणून घेत आहोत. भीमा कोरेगावचा तपास योग्य दिशेनं सुरू नाही असं आम्हाला वाटतं. त्यामुळं त्याचा विचार झाला पाहिजे.” असंही त्यांनी सांगितलं.

मराठा आरक्षणावर बोलताना पवार म्हणाले…
मराठा आरक्षणावर बोलताना शरद पवार म्हणाले, “माझी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली नाही. या विषयावर लवकरात लवकर तोडगा काढला जावा ही राज्य सरकारची इच्छा आहे.

कंगना बिल्डींग प्रकरणी बोलताना पवार म्हणाले….
कंगना बिल्डींग प्रकरणी बोलताना पवार म्हणाले, “माझी पण इच्छा आहे. माझ्या नावावर अशी कोणी बिल्डींग करावी. अर्थात जे कोणी बोलत आहे त्या व्यक्तीकडून जबाबदारीनं बोलण्याची अपेक्षा धरावी का ? हा प्रश्न आहे” असंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं.