‘ॲपल’च्या युजर्ससाठी खुशखबर ! मार्चमध्ये येणार स्वस्तातला ‘आयफोन’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रीमियम स्मार्टफोन कंपनी चा ॲपल चा SE2 हे मॉडेल मार्च महिन्यात लॉन्च होणार आहे . हा सगळ्यात स्वस्त किमतीचा आयफोन असणार असून माहितीनुसार त्याला ‘आयफोन ९’ असे नाव देण्यात येण्याची शक्यता आहे. नव्या फोनमध्ये ४.७ इंचाचा एलसीडी डिस्प्ले, टच आयडी, होम बटन आणि खूपच स्लीम बेजल्स देण्याची शक्यता आहे. यात ३.५ एमएम हेडफोन जॅक नसण्याची शक्यता आहे.

आयफोन ९ मध्ये A13 Bionic चिप दिली जाणार असून अशा प्रकारची चिप आपल्याला लेटेस्ट आयफोन ११ मध्ये बघायला मिळाली होती. आत्ताच फोन हा कंपनीच्या लेटेस्ट iOS 13 वर चालणार आहे. एका रिपोर्ट नुसार हा फोन मार्च मध्ये येणार असल्याची शक्यता आहे, परंतू कंपनीने अधिकृतपणे काहीही सांगितलेले नाही. आयफोन एसइ २ ची किंमत ३९९ डॉलर म्हणजे २८ हजार इतकी आहे. या फोनचे डिझाईन ॲपल ८ सारखीच असणार असल्याचा खुलासा

ॲपल कंपनीचे अनालिस्ट मिंग ची कुओ यांनी केला आहे. तसेच आयफोन एसइ 2 ला ५.४ इंच मध्येही उतरवले जाऊ शकते. त्यामुळे या फोनची साईज आयफोन ७ इतकी असू शकते.