मुंबई इंडियन्सच्या ‘या’ गोलंदाजाने सांगितले खोटे वय ; येऊ शकते बंदी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आयपीएलच्या १२ व्या हंगामात आपल्या वेगवान गोलंदाजीने प्रभावित करणारा मुंबई इंडियन्सचा १७ वर्षाचा गोलंदाज रासिख सलाम वादात सापडला आहे. जम्मू काश्मीरच्या राज्य स्कुल शिक्षा बोर्डाने काश्मीर क्रिकेट संघाला पत्र लिहून सांगितले आहे की, रासिख याने त्याच्या वयाबाबतची खोटी माहिती दिली आहे.

या प्रकरणाबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू काश्मीरच्या स्कुल बोर्डाने काश्मीर क्रिकेट संघाला पत्र लिहून सांगितले की, रासिख ने जे वय क्रिकेट बोर्डाला सांगितले आहे ते वय शाळेतील वयाशी जुळत नाही.

जम्मू काश्मीरच्या स्कुल बोर्डाने BCCI ला सांगितले की, यांवर कोणतीही कारवाई करण्याच्या आधी बोर्डाने या प्रकरणाकडे लक्ष्य द्यावे. रसिखला ९ जूनला इंग्लंडसोबत होणाऱ्या त्रिकोणीय मालिकेत अंडर १९ च्या संघात निवडले होते. यामध्ये भारत आणि इंग्लंडसोबत बांगलादेशचा संघ देखील सहभागी आहे. जेकेसीएच्या एका माजी सदस्याने सांगितले की,  प्रशासकांच्या उपस्थितीत अशाप्रकारची घटना घडणे योग्य नाही.

त्यांनी सांगितले की, आमच्याजवळ आता दोन प्रशासक आहेत, त्यांच्या उपस्थित अशाप्रकारच्या घटना घडणे ही खूप दुःखद गोष्ट आहे. खेळाडूंनी त्यांच्या वयासोबत छेडछाड केली नाही पाहिजे कारण हे पाप आहे. त्याचबरोबर अशा प्रकारच्या वागणुकीमुळे पुढे चालून येणाऱ्या संधी मिळणार नाहीत.

सर्वोच्च न्यायालयाकडून नियुक्त करण्यात आलेल्या प्रशासकीय समितीच्या बैठकीत स्पष्ट करण्यात आले आहे की कोणताही खेळाडूने त्याच्या वयासोबत छेडछाड केल्यास तो खेळाडू दोन सिजनपर्यंत खेळ खेळू शकत नाही. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. यामुळे रसिख संकटात सापडू शकतो.

आरोग्यविषयक वृत्त (www.arogyanama.com)

जरा जपून, ‘या’ कारणांमुळे होऊ शकते केस गळती

धक्कादायक ! भारतीयांचं वयोमान वायू प्रदूषणामुळे तब्बल ‘एवढ्या’ वर्षांनी झाले कमी

‘या’ कारणामुळे सकाळी उठल्यावर मोबाईलचा वापर शक्यतो टाळाच

यामुळे कारणांमुळें वाढत महिलांचं वजन