IPL 2019 : उद्याच्या सामन्यासाठी धोनी-विराट सज्ज

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – देशात लोकसभेच्या वातावरणासह आयपीएलचं वातावरणही जोरात आहेत. शनिवारपासून (२३ मार्च) आयपीएलच्या तेराव्या हंगामाला सुरुवात होणार आहे. पहिला सामना भारतीय संघातील सर्वाधिक प्रसिद्ध कर्णधारांचे संघ एकमेकांविरोधात खेळणार आहेत. हा सामना गतविजेता चेन्नई सुपरकिंग्ज संघ आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाशी खेळणार आहे. त्यामुळे हा सामना पाहण्यासाठी प्रेक्षकही तुडुंब गर्दी होईल हे निश्चित.

पहिल्या सामन्यासाठी विराट कोहली आणि धोनी दोघांनी संघासोबत कसून सराव करायला सुरुवात केली आहे. या दोन्ही संघाच्या सरावसत्राचे फोटो नुकतेच सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहेत. हे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. तर प्रत्येक संघाचे चाहते हे फोटो मोठ्या प्रमाणात लाईक करत आहेत.

 

 

दरम्यान, गेल्या हंगामात चेन्नईने सनराईजर्स हैदराबादवर मात केली होती. त्यामुळे यंदाच्या हंगामातही धोनीच्या चेन्नई संघाला विजयाचं प्रबळ दावेदार मानलं जात आहे. मात्र, गेल्या काही हंगामात विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला जास्त चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे यंदा विराट पूर्ण ताकदीने मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे. तसंच धोनीच्या संघाला नमवण्यासाठी विराट पूर्ण प्रयत्न करणार आहे.