IPL FINAL 2019 : मुंबई इंडियन्स चॅम्पियन्स !

हैद्राबाद : वृत्तसंस्था –  मुंबईच्या विजयानंतर जल्लोषाला हैद्राबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये उधाण आले. मुंबई संघाचा कर्णाधार रोहीत शर्मा याने आयपीएल चषक उंचावला, तेव्हा आकाशात रंगबेरंगी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. या फटाक्यांच्या आतिषबाजीत मुंबई संघ न्हाऊन गेला. हा क्षण साऱ्या क्रिकेट प्रेमींनी पाहिला. मुंबई संघाने चेन्नई संघाचा १ धावांनी पराभव करून आपीएलच्या १२ व्या मोसमातील चषक पटकावला. मुंबई संघाच्या विजयाची धुंदी स्टेडियममध्ये उपस्थित चाहत्यांनीही मनसोक्त जल्लोष करून जागवली तसेच स्टेडियमबाहेरही उत्सवाचे आणि उत्साहाचे वातावरण होते.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून मुंबईच्या संघाने फलंदाजीचा निर्णय घेतला पण चेन्नईच्या गोलंदाजांनी मुंबईला मोठी धावसंख्या करू दिली नाही. मुंबईचा संघला फक्त १४९ धावा करता आल्या. मुंबईकडून पोलार्डने सर्वात जास्त ४१ धावा केल्या. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात मुंबई संघाने चौथ्यांदा विजेतेपद पटकावले.

या स्पर्धेत मुंबई आणि चेन्नई ३ वेळा आमने सामने आले. पण तीनही सामन्यात मुंबईने चेन्नईवर विजय मिळवला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात मुंबईचे पारडे जड असल्याचे बोलले जात आहे. दोनही संघांकडे ३-३ IPL विजेतेपदं आहेत. त्यामुळे आजच्या सामन्यात विजय मिळवत या स्पर्धेच्या विजेतेपदाचा चौकार कोण मारणार याकडे साऱ्यांचे लक्ष होत. अखेर मुंबई संघाने आयपीएलच्या चषकावर आपले नाव कोरत चौथ्यांदा चॅम्पियन्स होणाचा मान राखला.

मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात मुंबईकडून फिरकीपटू जयंत यादवला वगळण्यात आले असून त्या जागी वेगवान गोलंदाज मिचेल मॅक्लेनघन याला संधी देण्यात आली. चेन्नईच्या संघात मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

मुंबई संघाने यंदाचा आयपीएलचा चषक जिंकत २० कोटी रुपयांच्या बक्षीसाची कमाई केली. तर उपविजेत्या संघाला १२.५ कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात आले. त्यासोबत वेगवेगळ्या गटांमधील खेळाडूंना देखील मोठी बक्षीसे देण्यात आली.

आयपीएलमधील बक्षिसांची रक्कम
विजेता संघ : 20 कोटी रुपये
उपविजेता संघ (रनर-अप) : 12.5 कोटी रुपये
ऑरेंज कॅप (सर्वाधिक धावा करणारा खेळाडू) : 10 लाख रुपये
पर्पल कॅप (सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू) : 10 लाख रुपये
मोस्ट वॅल्यूबल प्लेयर ऑफ द ईयर : 10 लाख
इमर्जिंग प्लेयर ऑफ द सिजन : 10 लाख
गेम चेंजर ऑफ द सिजन : 10 लाख
परफेक्ट कॅच ऑफ द सिजन : 10 लाख
स्टाइलिश प्लेयर ऑफ द सिजन : 10 लाख
सुपर स्ट्राइकर ऑफ द सिजन : कार आणि चषक