IPL : कोहनीनं KL राहुलला दिले 2-2 ‘विराट’ जीवनदान, दुबईमध्ये बनलं ‘कीर्तिमान’ (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयपीएलच्या १३ व्या हंगामातील सहावा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या (आरसीबी) कर्णधार विराट कोहलीला कधीच आठवणीत ठेवावा वाटणार नाही, तर प्रतिस्पर्धी कर्णधार केएल राहुल जगातील सर्वात चित्तथरारक टी-२० लीगच्या रेकॉर्ड बुकमध्ये सामील झाला. गुरुवारी रात्री दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर किंग्ज इलेव्हन पंजाबचा (केएक्सआयपी) कर्णधार केएल राहुलची बॅट फलंदाजी करत होती.

केएल राहुलने अवघ्या ६९ चेंडूत नाबाद १३२ धावा (१४ चौकार, ७ षटकार) ठोकले. त्याच्या या खेळीमुळे पंजाबने २०६/३ असा स्कोअर केला आणि प्रत्युत्तरात आरसीबी १७ ओव्हरमध्ये केवळ १०७ धावांवर राहिली. किंग्ज इलेव्हन पंजाबने ९७ धावांनी हा सामना जिंकून या हंगामात आपले खाते उघडले. ‘शॉर्ट रन’ कॉल वादात त्यांनी त्यांचा पहिला सामना गमावला होता.

विराट कोहलीने त्याचे एक नव्हे तर दोन कॅच गमावले. पहिला १७ व्या ओव्हरमधील शेवटच्या चेंडूवर डीप मिडविकेटवर कॅच सोडला, तर त्यानंतर १८ व्या ओव्हरमधील शेवटच्या चेंडूवर लाँग ऑफच्या दिशेने गेलेला आकाशातील शॉट त्याला पकडता आला नाही.

केएल राहुलने या जीवदानाचे शतकात रूपांतर केले. पहिला कॅच गमावल्यानंतर त्याने आपल्या खात्यात ४९ धावा केल्या. या दरम्यान त्याने शेवटच्या दोन ओव्हरमध्ये ९ चेंडूत (६, ४, ०, ६, ६, ४, ४, ६, ६) ४२ धावा ठोकल्या. मात्र आयपीएलच्या शेवटच्या दोन ओव्हरमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम करण्यासाठी २ धावांनी चुकला.

आयपीएल:  शेवटच्या दोन ओव्हरमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम
४४ (१०)- विराट कोहली विरुद्ध गुजरात लायन्स, २०१६
४२ (९)- केएल राहुल विरुद्ध आरसीबी, २०२०
३९ (११)- ब्रेंडन मॅक्युलम विरुद्ध आरसीबी, २००८

केएल राहुल आयपीएलमध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावा करणारा सर्वोच्च भारतीय फलंदाज ठरला
१३२ केएल राहुल विरुद्ध बेंगलुरू, २०२०
१२८ ऋषभ पंत विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, २०१८
१२७ मुरली विजय विरुद्ध राजस्थान रॉयल्स, २०१०

केएल राहुल आयपीएलमध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावा करणारा कर्णधारही बनला
१३२ – केएल राहुल, २०२०
१२६ – डेव्हिड वॉर्नर, २०१७
११९ – वीरेंद्र सेहवाग, २०११
११३ – विराट कोहली, २०१६
१०९ – विराट कोहली, २०१६
१०८ – विराट कोहली २०१६

दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहली किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या वैयक्तिक कामगिरीमुळे निराश आहे. त्याने म्हटले आहे की, त्याने संघाला पुढाकाराने नेतृत्व केले पाहिजे होते.

कोहलीने गुरुवारी झालेल्या या सामन्यात पंजाबचा कर्णधार केएल राहुलचे दोन कॅच सोडले, त्यानंतर राहुलने बंगळूरच्या गोलंदाजांवर अखेरच्या दोन ओव्हरमध्ये धावा फटकावल्या, तर कोहली फलंदाजीमध्येही अपयशी ठरला आणि फक्त एक धावा करता आली.

सामन्यानंतर पारितोषिक वितरण समारंभात कोहली म्हणाला, ‘मला पुढाकाराने पूर्ण जबाबदारी घावी लागेल, जर आम्ही त्यांना १८० धावांवर रोखले असते, तर पहिल्या चेंडूपासून आमच्यावर मोठे शॉट्स मारण्यासाठी दबाव आला नसता.’

ते म्हणाले, ‘अशा प्रकारच्या गोष्टी होत असतात. चांगले सामने, वाईट सामने येतच असतात. ही पुढे जाण्याची वेळ आहे. पण मी म्हटल्याप्रमाणे मी संघाचे नेतृत्व करायला हवे होते, ते दोन कॅच खूप महाग गेले. मी फलंदाजीबरोबरच आणखी चांगली कामगिरी करायला हवी होती.’