IPL 2021 : बिग बी म्हणाले, ‘अशक्य गोष्ट शक्य होते आणि…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –    कोरोना पार्श्वभूमीवर अखेर आयपीएल २०२१ स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत झालेल्या दोन सामन्यांची लढत अतिशय चुरशीचे होती. मंगळवारी झालेल्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्स संघावर मुंबई इंडियन्सने विजय मिळवला आणि त्यानंतर बुधवारी झालेल्या सनरायझर्स हैदराबाद संघावर रॉयल चॅलेंजर्स बेंंगळुरूने विजय मिळवला. या दोन्ही सामन्यांमध्ये विजयी झालेल्या संघाला मिळालेले यश अनपेक्षित होते.

यावर महानायक अमिताभ बच्चन यांनी एक ट्वीट केले आहे. त्यांचे हे ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या दोन्ही संघांचे चाहते आणि खुद्द बिग बी यांचे चाहते यावर भरभरून प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. अमिताभ बच्चन यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले की, ‘आयपीएलमध्ये गेल्या दोन दिवसांत जे सामने झाले त्यामध्ये विजयी झालेल्या संघांना हरता हरता विजय मिळाला आहे. असंभव नेहमीच संभव होते आणि यापुढेही होत राहील… ‘

या दोन्ही सामन्यांमध्ये एक क्षण असा आला होता की, त्यावेळी कोलकाता नाइटरायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघाचाच विजय होणार असे वाटत होते. परंतु ऐनवेळी या दोन्ही मॅच फिरल्या आणि निर्णय बदलला. अनुक्रमे मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंंगळुरू संघांचा विजय झाला. आरसीबी आणि सनरायझर्स यांच्या विरुद्धच्या सामन्यामध्ये शाहबाज अहमदने एका ओव्हरमध्ये तीन गडी बाद करत सामना एकहाती फिरवला. आरसीबीने सनरायझर्स हैदराबाद संघाला सहा धावांनी हरवले. आयपीएल २०२१ स्पर्धेत हैदराबाद संघाला सलग दुसऱ्यांदा पराभव पत्करावा लागला.

सिनेमांसोबत अमिताभ सोशल मीडियावरही सक्रीय असतात आणि चालू घडामोडींवर भाष्य करत असतात.अमिताभ बच्चन यांचे ‘चेहरे’, ‘झुंड’ आणि ‘मसान’ हे आगामी सिनेमे आहेत. या सिनेमांत बिग बी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.