धोनीच्या फोटोमुळं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का; स्वतः माही म्हणाला – ‘लवकरच समजेल काय ते’

पोलिसनामा ऑनलाईन टीम, दि. 14 मार्च 2021 – महेंद्रसिंग धोनीचा तो व्हायरल फोटो पाहून आपणही आश्चर्यचकित झाला ना..!. हो… टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आयपीएलच्या 14 व्या सत्राच्या तयारीत व्यस्त आहे. या दरम्यान, महेंद्रसिंग धोनीचे एक फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हायरल फोटो एखाद्या जाहिरातीच्या शुटिंगसारखे दिसत आहे. धोनीने मुंडण केलं आहे आणि एका जंगलात बौद्ध भिक्षूसारखे कपडे घालून बसला आहे, असेच या फोटो दिसत आहे.

स्टार स्पोर्ट्सने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलद्वारे याच्याशी जोडलेला 9 सेकंदाचा प्रोमो देखील शेअर केला आहे. महेंद्रसिंग धोनी या प्रोमोत असं म्हणत आहे की, ’ काय आहे या अवतार मागील मंत्र/कन्सेप्ट?, लवकरच कळेल.’

 

 

 

महेंद्रसिंग धोनीची टीम चेन्नई सुपर किंग्ज आयपीएल 2021 च्या तयारीमध्ये व्यस्त आहे. 10 एप्रिल रोजी चेन्नईचा संघ आयपीएलची मोहीम दिल्ली कॅपिटलशी सुरू करणार आहे.

एमएस धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्जने तीन वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. पण, शेवटचा आयपीएल मोसम चेन्नईसाठी खूप वाईट होता. मागील आयपीएलमध्ये सीएसकेने 14 पैकी केवळ 6 सामने जिंकले होते आणि टेबल लिस्टमध्ये 7 वे स्थान मिळविले होते. यावेळी धोनीने 14 सामन्यांत केवळ 200 धावा केल्या होत्या.

महेंद्रसिंग धोनीने 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने भारताकडून 350 एकदिवसीय सामने, 98 टी -20 आंतरराष्ट्रीय आणि 90 कसोटी सामने खेळून 17,266 धावा केल्या. या दरम्यान त्याने 108 अर्धशतके आणि 16 शतके ठोकली आहेत.