पोलीसनामा ऑनलाईन : IPL 2023 | नुकताच काल आयपीएल 2023 चा मिनी-लिलाव शुक्रवारी कोची येथे पार पडला. या लिलावात युवा खेळाडूंची चांदी झाली तर अनेक दिग्गज खेळाडूंना धक्का बसला आहे. या लिलावात आयसीसी टी-20 विश्वचषकात शानदार कामगिरी करणाऱ्या आयर्लंडच्या जोशुआ लिटलला मात्र मोठी लॉटरी लागली आहे. जोशुआ लिटलला 4.40 कोटी रुपयांची मोठी बोली लावून गुजरात टायटन्सने आपल्या संघात सामावून घेतले आहे.
A 𝙇𝙞𝙩𝙩𝙡𝙚 big shot of happiness for Gujarat Titans!
Welcome to GT, Joshua bhai! #TATAIPL | #IPLAuction | #AavaDe
— Gujarat Titans (@gujarat_titans) December 23, 2022
या लिलावापूर्वी जोशुआ लिटल या वर्षाच्या सुरुवातीला चेन्नई सुपर किंग्जमध्ये नेट बॉलर म्हणून सामील झाला होता, परंतु दोन आठवड्यांच्या आत त्याने एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जची साथ सोडली. त्याने आपला अनुभव सांगताना कोणी जखमी झाले तर त्याला खेळण्याची संधी मिळेल, असे सांगितले होते, परंतु तसे झाले नाही. अशा प्रकारे त्याची दिशाभूल करण्यात आली होती. यावेळी त्याने CSK वर अनेक गंभीर आरोप केले होते.
Agla season, #AavaDe! 💙👊#TATAIPL | #IPLAuction pic.twitter.com/VBLQC6SLzs
— Gujarat Titans (@gujarat_titans) December 23, 2022
जोशुआ लिटल हा गोलंदाज आयपीएलमध्ये करार मिळवणारा आयर्लंडचा पहिला क्रिकेटर आहे.
या लिलावासाठी जोशुआ लिटलने त्याची मूळ किंमत 50 लाख रुपये ठेवली होती.
पण लिलावादरम्यान त्याला गुजरात टायटन्सने त्याच्यावर 4.40 कोटी रुपयांची मोठी बोली लावून आपल्या
ताफ्यात सामावून घेतले. लिलावात जोशुआला विकत घेण्यासाठी लखनौ सुपरजायंट्स आणि गुजरातमध्ये कडवी
स्पर्धा रंगली होती.
Web Title :- IPL 2023 | ipl auction 2023 joshua little who has been a serious accuser of dhonis csk team will now be seen playing for gujarat titans
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Jaykumar Gore Accident | भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला भीषण अपघात
Mumbai Minor Girl Gang Rape Case | मुंबई हादरली! लोअर परळमध्ये 15 वर्षीय मुलीवर सामूहीक बलात्कार