IPL Betting Racket Busted In Wakad | ‘आयपीएल’ सामन्यावर सट्टा, वाकड पोलिसांकडून परराज्यातील 10 जणांना अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – IPL Betting Racket Busted In Wakad | ‘आयपीएल’मधील गुजरात टायटंन्स व किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यातील क्रिकेट सामन्यावर सट्टा खेळताना वाकडमध्ये परराज्यातील 10 जणांना पकडले. पोलिसांनी ही कारवाई गुरुवारी (दि.4) रात्री अकराच्या सुमारास केली. वाकड येथील मिलेनियम मॉलच्या समोर हा सट्टा खेळला जात होता. पोलिसांनी छापा घालून 6 लाख 58 हजारांचे साहित्य जप्त केले. (Pune Pimpri Chinchwad Crime)

सुर्यप्रताप कौशल्य सिंग Suryapratap Kaushalya Singh (वय-18 रा. मु.पो. सत्ती, ता. जि. सत्ती, छत्तीसगड), राजेश छोटेलाल कुराबहु Rajesh Chhotalal Kurabahu (वय-25 मु.पो. रगजा, ता. जि. सत्ती, छत्तीसगड), रणजित सरजु मुखीया Ranjit Sarju Mukhi (वय-20 रा. पुनद ता. घनशामपुर जि. दरभंगा, बिहार), शुभम पुलसी धरू Shubham Pulsi Dharu (वय-22 रा. तगदपुर, ता. जि. तगदपुर, छत्तीसगड), तिलेश अमितकुमार कुरेह Tilesh Amitkumar Kureh (वय-25 रा. रगजा, ता.जि. सत्ती, छत्तीसगड), जितु नविन हरपाल Jitu Naveen Harpal (वय-28 रा. शंकरनगर, रायपुर, छत्तीसगड), राहुलकुमार प्रकाश कुमार उराव Rahulkumar prakash kumar urao ( वय-22 रा. मु. मंदेली, पो. सोहटी ता. जि. सत्ती, छत्तीसगढ),

यश प्रसाद साहु Yash Prasad Sahu (वय-18 रा. टी.पी. नगर, जि. कोरबा, छत्तीसगड), किशन मनोज पोपटानी Kishan Manoj Poptani (वय-22 अमलेटी, जि. रायपुर, छ्तीसगड), समया सुखदास महंत Samaya Sukhdas Mahant (वय-26 रा. रोहदा, पो. बंबनेडी ता. जि. चापा छत्तीसगड) यांना अटक करण्यात आली आहे. तर कार्तिक उर्फ दिनेश आहुजा Karthik alias Dinesh Ahuja (रा. नागपुर), रामू बोमन (रा. छत्तीसगड) यांच्यावर आयपीसी 420, 464, 465, 467, 468, 471, 34 सह महाराष्ट्र जुगार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस अंमलदार सुनिल पांडुरंग काटे यांनी वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) फिर्याद दिली आहे. (IPL Betting Racket Busted In Wakad)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयपीएल क्रिकेट सामने (IPL Cricket Match) सुरू आहेत. आयपीएल क्रिकेट सामन्यावर बेटींग लावणाऱ्यांची माहिती काढून कारवाई केली जात आहे. वाकड पोलीस ठाण्यातील तपास पथक हद्दीत पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी मिलेनियम मॉलच्या समोरील बी बिल्डींग मधील फ्लॅट नं. 1101 मध्ये आयपील क्रिकेट सामन्यावर सट्टा घेतला जात असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा मारून कारवाई केली.

आरोपी आयपीएल सामन्यातील गुजरात विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब मध्ये सुरु
असलेल्या टी-20 सामन्यावर वेगवेगळे बेटिंग अॅपद्वारे सट्टा खेळत असताना आढळून आले.
तसेच आरोपी कार्तिक आहुजा व रामू बोमन यांनी क्रिकेट बेटिंगसाठी ग्राहकांकडून हार जित होणाऱ्या
रक्कमेचा व्यवहार देवाण घेवाण करण्यासाठी इतरांच्या नावाने बँक खाते उघडल्याचे समोर आले.
आरोपींनी बँक खात्यांचा वापर क्रिकेट बेटिंगसाठी करत असल्याचे निष्पन्न झाले.
वाकड पोलिसांनी या कारवाईत 6 लाख 58 हजार रुपये किमतीचे साहित्य जप्त केले आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अतुल जाधव करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुणे : तरुणीचा फोटो वापरुन इंन्स्टाग्रामवर तयार केले फेक अकाउंट, मॉर्फ फोटो व्हायरल करुन विनयभंग

Devendra Fadnavis In Indapur | इंदापुरातील कार्यकर्त्यांना देवेंद्र फडणवीसांचे आश्वासन, म्हणाले ”कृतीतून करून दाखवणार हा…”

Pune PMC Water Supply | पुणे मनपाकडून मोफतच पाणीपुरवठा, पैसे मागितल्यास तक्रार करण्याचे प्रशासनाचे आवाहन