IPL मध्ये स्पॉट फिक्सिंग ; ललित मोदींचा धक्कादायक खुलासा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयपीएलध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या तीन खेळाडूंनी स्पॉट फिक्सिंग केल्याचा खबळजनक खुलासा आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदी यांनी केला आहे. याबात मोदींनी आयसीसीला एक सविस्तर पत्र लिहिले आहे. रवींद्र जडेजा, सुरेश रैना आणि ड्वेन ब्राव्हो यांचा खेळाडूंनी एके क्रिकेट बुकीकडून लाच घेतली असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. मोदी यांनी आपल्या ट्विटमधून तर बीसीसीआयवर ताशेरे ओढले आहेत. यापूर्वी संघाचे चेन्नई सुपर किंग्सचा मालक एन. श्रीनिवासन यांचा जावयाला सट्टेबाजीप्रकरणी अटक करण्यात आली होती.

ललित मोदीने पत्रामध्ये म्हंटले आहे की, ‘आयीएलच्या प्रत्येक सामन्यावर ९-१० हजार कोटी रुपयांचा सट्टा लागतो. हा एवढा पैसा कुठून येतो, याचा विचार बीसीसीआय, आयसीसी यांनी करावा. रवींद्र जडेजा, सुरेश रैना आणि ड्वेन ब्राव्हो या तीन खेळाडूंनी बाबा दिवान या मोठ्या बुकीकडून लाच घेतली आणि त्यानंतर त्यांनी स्पॉट फिक्सिंग केले. दिवान एचडीआयएल या रिअल इस्टेट कंपनीशी संलग्न आहे. त्यामुळे दिवानने रैना आणि जडेजा यांना एक प्रॉपर्टीही देण्यात आली आहे. रैनाला नोएडा येथील वसंत विहारमध्ये एक प्रॉपर्टी देण्यात आली आहे. तर जडेजाला मुंबईतील वांद्रे येथे एक प्रॉपर्टी दिली आहे. ब्राव्होने मात्र प्रॉपर्टीऐवजी कोट्यावधी रुपयांमध्येच सौदा केला.

LALIT-MODI

दरम्यान मोदी यांनी यापूर्वीही रैनावर मॅच फिक्सिंगचा आरोप केला होता. ललित मोदींवर फेमा आणि पीएमएलए कायद्याचं उल्लंघन केल्याचा आरोप आहे. ललित मोदींविरोधातील १७ प्रकरणाचा तपास सध्या ईडी करतं आहे. आयपीएल घोटाळा उघड झाल्यानंतर ललित मोदी हे इंग्लंडमध्येच राहत आहेत.