‘कमांडो 3’ सिनेमावर IPS अधिकाऱ्याचा आक्षेप, स्कुल गर्लचा स्कर्ट ओढल्यानं ‘खळबळ’ ! (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार विद्युत जामवाल स्टारर कमांडो 3 सिनेमाला पब्लिक आणि क्रिटीक्सचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसत आहे. परंतु रिलीज होताच हा सिनेमा आपल्या इंट्रोडक्टरी सीनमुळे कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये सापडला आहे. या सीनमध्ये एक पैलवान शालेय मुलीचा स्कर्ट उचलताना दाखवला आहे. या सीनला घेऊन लोकांनी गोंधळ केला आहे. आता आयपीएस अनुज चौधरी यांनीही सिनेमातील या सीनविरोधात भूमिका घेतली आहे. त्यांनी फेसबुक लाईव्ह करत हा सीन काढण्यास सांगितलं आहे.

डेप्युटी एसपी अनुज चौधरी म्हणाले, “कमांडो 3 सिनेमात आखाड्याच्या बाजूने जाणाऱ्या एका मुलीला पैलवान छेडताना दाखवला आहे. यामुळे खेळाडूंच्या भावना दुखावल्या जात आहेत. देशाच्या सन्मानासाठी मेडल जिंकणाऱ्या सर्व पैलवानांच्या स्वाभिमानाला ठेस पोहोचवणारा हा सीन आहे. सिनेमात मसाला टाकण्यासाठी यांना खऱ्या आणि नकली हिरोमधील फरकच कळत नाही. ही कशी मानसिकता आहे. कुठेही थोडी माती आणि दोन-तीन डम्बल टाकले म्हणजे आखाडा होतो का. आखाडा म्हणजे आम्हा सर्व पैलवानांचं मंदिर आहे. पैलवान देशाचा सन्मान आणि मुलींची इज्जत आहे. आई-बहिणींचं रक्षण करण्यासाठी ते नेहमीच तयार असतात.”

सेंसर बोर्डाबाबत सवाल उपस्थित

पुढे ते म्हणाले, “मी या व्हिडीओच्या माध्यमातून डायरेक्टरला प्रश्न विचारू इच्छितो की, तुम्ही देशात कोणता आखाडा पाहिला आहे जिथे पैलवान मुलींना छेडतात. सेंसर बोर्डही असे सिनेमे दाखवण्यासाठी परवानगी कसं देतं?”

हा हटवण्यात यावा आणि डायरेक्टर आदित्य दत्त, प्रोड्युसर आणि लेखक तसेच अ‍ॅक्टर विद्युत जामवाल यांनीही याबाबत माफी मागावी अशी मागणीही त्यांनी केली. अशा सिनेमांवर सेंसर बोर्डनंही बंदी आणावी अन्यथा आम्ही कोर्टात मानहानीची केस दाखल करू असंही त्यांनी म्हटलं. डेप्युटी एसपी अनुज चौधरी आंतरराष्ट्रीय स्तरावरील रेसलिंग चॅम्पियन आहेत. त्यांना राष्ट्रपतींकडून अर्जुन अवॉर्ड तर युपी सरकारकडून यश भर्ती सन्मानानं गौरविण्यात आलं आहे.