IPS Saurabh Tripathi | निलंबित पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठींना न्यायालयाचा दिलासा, जाणून घ्या प्रकरण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अंगडिया व्यापाऱ्यांकडून खंडणी (Angadia Extortion Case) उकळल्याप्रकरणी एलटी मार्ग पोलिस ठाण्यात (LT Marg Police Station) दाखल झालेल्या गुन्ह्यात निलंबित (Suspended) पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी (IPS Saurabh Tripathi) यांना अंतरिम जामीन (Interim Bai) मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) सौरभ त्रिपाठी (IPS Saurabh Tripathi) यांच्या अटकेला स्थगिती देताना त्यांना 9 नोव्हेंबर रोजी चौकशी अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. अटकपूर्व जामीन (Anticipatory Bail) अर्जावर पुढील सुनावणी 15 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

 

एलटी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल झाल्यानंतर सौरभ त्रिपाठी (IPS Saurabh Tripathi) हे बेपत्ता होते. तब्बल नऊ महिन्यानंतर त्यांना न्यायालयाकडून तात्पुरता दिलासा मिळाला आहे. दरम्यान, त्रिपाठी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. सौरभ त्रिपाठी यांचे वकील विनोद चाटे (Lawyer Vinod Chate) यांनी सौरभ त्रिपाठी हे तपासात सहकार्य करतील असे आश्वासन दिले. यानंतर न्यायालयाने सौरभ त्रिपाठी यांच्या अटकेला पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती दिली. पुढील सुनावणी 15 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

 

अंगडिया व्यापाऱ्यांकडून खंडणी वसुल केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी सौरभ त्रिपाठी यांच्यावर आरोपपत्र (Charge Sheet) दाखल केले होते. मुंबई क्राईम ब्रँचच्या(Mumbai Crime) मुंबई क्राईम इंटेलिजन्स युनिटने (Mumbai Crime Intelligence (CIU) याप्रकरणी 1100 पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. आरोपपत्रामध्ये 70 जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. यामध्ये काही अंगडिया व्यावसायिक आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे. IPS सौरभ त्रिपाठी यांच्यावर अंगडिया व्यावसायिकांकडे हप्ता मागितल्याचा आरोप आहे. याप्रकरणात CIU ने आतापर्यंत अनेक जणांना अटक केली आहे.

काय आहे प्रकरण?
IPS अधिकारी सौरभ त्रिपाठी यांच्यावर आरोप आहे की झोन-2 चे पोलीस उपायुक्त असताना त्यांनी पैशांची मागणी केली.
त्यांनी आंगडिया व्यापाऱ्यांकडे दरमहा 10 लाख रुपयांच्या हप्त्याची मागणी केली.
त्रिपाठी यांच्या त्रासाला कंटाळून अंगडिया व्यापाऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती.
व्यापाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्रिपाठी यांनी डिसेंबर महिन्यात अनेक वेळा आयकर विभागाला (Income Tax Department) रोखीने व्यवहार केल्याची माहिती देण्याची धमकी देऊन पैसे उकळले.
अंगडिया व्यापाऱ्यांच्या तक्रारीनंतर महाराष्ट्र सरकारने आरोपी पोलीस उपायुक्त (DCP) सौरभ त्रिपाठी यांना मार्चमध्ये निलंबित केले.

 

Web Title :- IPS Saurabh Tripathi | suspended dcp ips saurabh tripathi gets interim bail in extortion case from angadiya traders

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sushma Andhare | अण्णा हजारेंच्या जनलोकपाल आंदोलनावरुन सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप, म्हणाल्या- ‘सरकार उलथवून टाकण्यासाठीच…’

Pune Crime | वीज खंडीत करण्याची भिती दाखवून महिलेला घातला 1 लाखांचा गंडा, बाणेर येथील घटना

Sudhir Suri | शिवसेना नेते सुधीर सुरी यांची गोळ्या झाडून हत्या, एका संशयित हल्लेखोराला अटक