‘सुलेमानी’च्या अंत्ययात्रेत रडले ‘खुमैनी’, रूहानींनी ‘इशारा’ देत सांगितलं – ‘अमेरिकेनं बिलकूल धमकी देऊ नये’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इराणची राजधानी असलेल्या तेहरान येथे सोमवारी जनरल सुलेमानी यांना अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी लोक हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरलेले होते. यावेळी लोक दुःखी असले तरीही त्यांच्यामध्ये खूप राग होता हे लोक सरकारकडे सुलेमानीच्या बदल्याची मागणी करत होते.

जनरच्या अंत्यसंस्कारावेळी रडले खुमैनी
इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते अयातुल्ला अली खुमैनी हे सुलेमानी यांना निरोप देताना चांगलेच भावून झाले आणि रडल्याचे पहायला मिळाले. समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये खुमैनी रडताना दिसत आहे. जनरल कासिम यांना शेवटचा निरोप देण्यासाठी तेहरान विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये आयोजित कार्यक्रमाला प्रचंड गर्दी जमली होती.

अमेरिकेने धमकी देऊ नये 
इराणचे राष्ट्रपती हसन रुहानी यांनी अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प यांना इशारा देत म्हंटले की, अमेरिकेने कोणत्याही प्रकारची धमकी इराणला देऊ नहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला इशारा दिला होता त्यानंतर रुहानी यांनी त्याला प्रतिउत्तर दिले आहे. रुहानी यांनी एका ट्विटमध्ये लिहिले की, जे 52 क्रमांकाचा उल्लेख करत आहेत त्यांनी 290 हा क्रमांक देखील लक्षात ठेवावा. इराणी राष्ट्राला धमकी देऊ नका. ट्रम्प यांनी इराणच्या 52 ठिकाणांवर हल्ला करण्याचे वक्तव्य केलेले होते. याला उत्तर देताना रुहानीने जुलै 1988 च्या घटनेची आठवण करून दिलेली होती, ज्यावेळी इराणी विमानावर हल्ला झाला होता त्यावेळी या हल्ल्यात 290 लोक मारले गेलेले होते.

वाढणाऱ्या तणावावर UN चिंतीत
अमेरिका आणि इराण यांच्यात वाढत चालेल्या तणावामुळे संयुक्त राष्ट्राला देखील आता चिंता वाटू लागली आहे. संयुक्त राष्ट्र महासचिव अंतोनियो गुतेरेस यांनी अमेरिका आणि इराणला संयम ठेवण्याचे आवाहन केले आहे. यावेळी बोलताना गुतेरेस यांनी म्हंटले की, नव्या वर्षाची सुरुवात ही खळबळजनक घटनेने झाली आहे आणि आपण सर्वजण भयानक काळातून जात आहोत तणाव आणि अशांती मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/