गर्लफ्रेन्डला फिरविण्याठी दुचाकी चोरणारा इराकी नागरिक अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – युनायटेड नेशन्स हायकमीशनर फॉर रिफ्यूजी स्टेटसच्या पत्रावर बारा वर्षांपासून भारतात  राहणाऱ्या इराकी तरुणाला गुन्हे शाखेच्या युनीट चारच्या पथकाने अटक केली आहे. गर्लफ्रेन्डला फिरविण्यासाठी त्याने दुचाकी चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

अक्रम अल्बदेअरी फैज अल्बदेअरी (२०, कोंढवा, मुळ. औरंगाबाद) असे अटक करण्यात आलेल्याच तरुणाचे नाव आहे. तर त्याच्या साथीदाराचा शोध सुरु आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शआखेच्या युनीट चारचे पथक हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी सहायक पोलीस फौजदार अब्दुल करीम सय्यद व पोलीस हवालदार गणेश साळुंखे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एकजण पल्सरवर फिरत असून त्याने ती दुचाकी चोरून आणलेली आहे. त्यानंतर युनीट चारच्या पथकाने अल्बदेअऱी याला अटक केली. त्याच्याकडे चौकशी केली तेव्हा त्याने त्याचा साथीदार औस मेहंदी (३३, कोंढवा) याच्यासोबत मिळून स्कूटर चोरल्या आहेत. त्याच्याकडून २ लाख ९ हजार रुपये किंमतीच्या चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

अल्बदेअरी आणि त्याचा साथीदार हे दोघेही इराकी नागरिक आहेत. ते युनायटेड नेशन्स हायकमीशनर फॉर रिफ्यूजी स्टेट्‍सच्या पत्रावर भारतात राहतो आहे. त्याचे वास्तव्य भारतात मागील बारा वर्षापासून आहे. त्याची आई औरंगाबाद येथे राहण्यास आहे. तर तो कोंढव्यात राहतो. त्याने शहरात साथीदारासोबत मिळून दुचाकी चोरल्या आहेत. त्याने औरंगाबाद येथून एक दुचाकी चोरली होती.तिच्यावर क्रमांक बदलून तो फिरत होता. तसेच गर्लफ्रेंडला फिरविण्यासाठी तो दुचाकी चोरत होता असे त्याने सांगितले.

ही कारवाई अप्पर पोलीस आय़ुक्त प्रदिप देशपांडे, पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अंजूम बागवान, सहायक पोलीस निरीक्षक गणेश पवार, सहायक पोलीस फौजदार अब्दुल सय्यद, भालचंद्र बोरकर, गणेश साळुंके, सुनील पवार, रमेश साबळे, शितल शिंदे, सचिन ढवळे, शंकर संपते, रमेश चौधर, निलेश शिवतरे, अतुल मेगे, सतिश वणवे, विशाल शिर्के यांच्या पथकाने केली.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like