खुशखबर ! रेल्वेची भन्नाट ऑफर… फक्त ‘एवढ्या’ रुपयात फिरुन या ‘गोवा’

ADV

पणजी : वृत्तसंस्था – आयआरसीटीसी ( IRCTC ) कडून उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये फिरण्यासाठी प्रवाशांसाठी एक भन्नाट ऑफर देण्यात आली आहे. ज्यामध्ये प्रवाशांना उन्हाळ्याची सुट्टी एन्जॉय करता यावी म्हणून एक पॅकेज देण्यात आले आहे.

उन्हाळ्याची सुट्टी सुरु झाली आहे. या सुट्ट्यांमध्ये सर्वांना कुठे ना कुठे तरी फिरायची इच्छा होत असते. मात्र काही प्रवाशांचे आर्थिक भांडवल कमी असते तर काही जणांचे जास्त असते. आयआरसीटीसी (IRCTC) ने याकडेच पाहता प्रवाशांसाठी एक भन्नाट ऑफर दिली आहे. ज्यामध्ये प्रवाशांना उन्हाळ्याची सुट्टी एन्जॉय करता यावी म्हणून एक पॅकेज आणले आहे. ज्यामध्ये तुम्ही केवळ १० हजारांमध्ये गोवा-हैदराबाद-पुरी-कोणार्क आणि कोलकातामधील प्रसिद्ध ठिकाणांचे पर्यटन करू शकता. या पॅकेज अंतर्गत २० मेपासून यात्रेला सुरुवात होणार आहे.

ADV

VACATION SPECIAL SZBD354 असे या पॅकेजचे नाव आहे. या प्रवासादरम्यान त्रिवेंद्रम, कोल्लम, कोटायम, मुदरई, एर्नाकुलम टाउन , तृश्शूर, शोरानूर जंक्शन, कोझिकोड, कुन्नूर, कसरगोड तसेच डी-बोर्डिंग स्टेशन पलक्कड, तृश्शूर, एर्नाकुलम, कोटायम, त्रिवेंद्रम आणि मदुरई. या स्टेशनवर ट्रेन थांबणार आहे.