IRCTC Ticket Booking Rules | रेल्वेने बदलले तिकिट बुकिंगचे नियम, Railway Ticket बुक करणे आता होऊ शकते सोपे; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – IRCTC Ticket Booking Rules | तुम्ही देखील भारतीय रेल्वेने प्रवास करत असाल आणि स्वत:चे तिकीट बुक (Railway Ticket) करण्यात स्वारस्य असेल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वे तिकीट बुक करताना दिलेली माहिती भरण्यासाठी लागणार्‍या वेळेमुळे बर्‍याच वेळा तुमचे कन्फर्म (Confirm Railway Ticket) केलेले तिकीटही वेटिंगमध्ये (Waiting Railway Ticket) जाते. आता तुमची समस्या दूर होऊ शकते. (IRCTC Ticket Booking Rules)

 

भारतीय रेल्वेने तिकीट बुकिंगचे नियम बदलले आहेत. कोरोना व्हायरसच्या संकटाच्या काळात, भारतीय रेल्वेने (Indian Railways) तिकीट बुक करताना प्रवाशांना गंतव्यस्थानाचा पत्ता प्रविष्ट करणे आवश्यक केले आहे. आता देशात आणि जगात कोरोनाची प्रकरणे कमी होत असताना भारतीय रेल्वेने तिकीट बुकिंगमध्ये गंतव्यस्थानाचा पत्ता टाकण्याचा नियम काढून टाकला आहे.

 

देशातील लाखो लोक भारतीय रेल्वेतून दररोज प्रवास करतात.
प्रवाशांना आरामदायी प्रवासासह एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाण्यास मदत करण्यात भारतीय रेल्वे मोठी भूमिका बजावत आहे.
सहसा प्रवाशांना रेल्वे तिकीट काढताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. (IRCTC Ticket Booking Rules)

 

रेल्वे तिकीट बुकिंगच्या नियमात या बदलानंतर प्रवाशांची मोठी सोय होऊ शकते.
रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे की, जे लोक IRCTC वेबसाइट आणि अ‍ॅपद्वारे तिकीट बुक करतात त्यांना गंतव्य पत्ता प्रविष्ट करणे आवश्यक नाही. कोरोना प्रकरणांमध्ये घट झाल्यानंतर IRCTC ने हा पुढाकार घेतला आहे.

हा आदेश रेल्वे मंत्रालयाने जारी केला आहे. कोरोना महामारी दरम्यान, तिकीट बुकिंगच्या वेळी गंतव्य पत्ता नोंद करणे आवश्यक होते कारण प्रवासी कोविड -19 पॉझिटिव्ह आढळल्यास त्याला शोधता येईल.

 

कोविड संकटाच्या काळात संसर्गावर मात करण्यासाठी रेल्वेने अनेक नियम लागू केले होते.
कोरोनाचे रुग्ण कमी होऊन स्थिती सामान्य झाल्यावर सर्व नियम एक एक करून मागे घेतले जात आहेत.

 

रेल्वे तिकीट बुकिंगच्या वेळी गंतव्य पत्त्याची माहिती मागू नये, असे आदेश रेल्वे मंत्रालयाने सर्व रेल्वे झोनला दिले आहेत.
CRIS आणि आयआरसीटीसीलाही आदेशानुसार सॉफ्टवेअरमध्ये बदल करावे लागतील.

 

Web Title :- IRCTC Ticket Booking Rules | irctc ticket booking rules changed no need to fill destination address what you need to know

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा