Pune Municipal Elections 2022 | प्रभाग 1 धानोरीमध्ये एक जागा खुल्या गटासाठी राहणार ! प्रभाग 1 व 13 मध्ये Draw पडणार नाही !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Municipal Elections 2022 | पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग क्र. 1 (धानोरी-Dhanori) मध्ये एक जागा अनुसूचित जाती Scheduled Castes (SC) व एक जागा अनुसूचित जमातीसाठी Scheduled Tribes (ST) राखीव (SC-ST Reservation) असल्याने या प्रभागातील (Dhanori Prabhag) तिसरी जागा सर्वसाधरण खुल्या गटासाठी खुली राहणार आहे. येत्या 31 मे रोजी होणाऱ्या आरक्षण सोडती मध्ये प्रभाग क्र. 1 आणि दोन सदस्य संख्या असलेल्या प्रभाग 13 (सुस – बाणेर Sus-Baner) मध्ये सोडत होणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. (Pune Municipal Elections 2022)

 

महापालिकेच्या 173 जागांसाठी आणि 58 प्रभागातील अनुसूचित जातीच्या 23 , अनुसूचित जमातीच्या 2 आणि महिलांसाठीच्या आरक्षणाची सोडत 31 मे रोजी सकाळी 11 वाजता गणेश कला क्रिडा मंच येथे होणार आहे. यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. दरम्यान प्रभाग क्र. 1 मध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी ही आरक्षण असल्याने खुल्या गटाला प्रतिनीधित्व मिळणार की नाही याबद्दल उत्सुकता वाढली होती. (Pune Municipal Elections 2022)

 

अनुसूचित जाती च्या 23 पैकी 13 जागा महिलांसाठी राखीव असतील तर अनुसूचित जमातीची एक जागा महिला व एक पुरुषासाठी राहील. अनुसूचित जमातीचे प्रभाग क्र. 1 आणि प्रभाग क्र. 14 मध्ये आरक्षण आहे. अनुसूचित जातीसाठी प्रभागातील अ क्रमांकाची जागा राखीव राहणार असून अनुसूचित जमातीचे आरक्षित जागा ‘ब’ क्रमांकावर राहिल.

आरक्षित जागांची सोडत काढल्यानंतर महिला आरक्षण काढले जाणार आहे. अनुसूचित जाती महिला आरक्षणाच्या 12 जागा व अनुसाचीत जमातीची एक जागा तसेच द्विसदस्यीय प्रभाग क्र. 14 मधील एक अशा महिला आरक्षणाच्या 14 जागांचे आरक्षण निश्चित झाल्यानंतर उर्वरित 44 प्रभागांमधील प्रत्येकी एक जागा खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव राहातील. (Pune PMC Elections 2022)

 

महिलांसाठी 87 जागा राखीव आहेत. त्यापैकी 58 जागा निश्चित झाल्यानंतर उर्वरित 29 महिला जागांचे आरक्षण हे
प्रभाग क्र 1 आणि 13 वगळून उर्वरित प्रभागामध्ये टाकण्यासाठी सोडत काढली जाईल, अशी माहिती पालिकेतील विश्वसनीय सूत्रांनी दिली.

 

Web Title :- Pune Municipal Elections 2022 | There will be one seat for open group in Ward 1 Dhanori! Wards 1 and 13 will not be drawn SC-ST Reservation

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा