IRS अधिकारी आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांचे अति. खा. सचिव अनंत तांबेंचे 32 व्या वर्षी कोरोनाने निधन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  IRS अधिकारी अनंत तांबे (वय 32) यांचे कोरोनामुळे निधन झाले. काही दिवसापूर्वी त्यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यांच्यावर औरंगाबादमध्ये उपचार सुरु होते. उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. तांबे यांचे अवघ्या 32 व्या वर्षी निधन झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचे ते अतिरिक्त खाजगी सचिव म्हणून काम पाहत होते. तांबे यांच्या निधनानंतर मंत्री जावडेकर यांनी ट्वीट करत शोक व्यक्त केला आहे. तांबें यांच्या अचानक आणि अकाली निधनामुळे फार दु:खी आहे. कोरोनामुळे वयाच्या 32 व्या वर्षी अनंत तांबे यांचे निधन झाले. ते अतिरिक्त पीएस म्हणून काम करत होते. एक तरुण आणि तेजस्वी आयआरएस अधिकारी गमावल्याचे दुःख आहे. माझ्या प्रार्थना त्याच्या कुटुंबासमवेत असल्याचे म्हटले आहे. दरम्यान तांबे हे चांगले अधिकारी म्हणून परिचीत होते. केंद्रात प्रतिनियुक्तीला जाण्यापूर्वी ते पुण्यात तैनात होते.