तुमचे आधारकार्ड सुरक्षित आहे का ? ; ‘या’ सोप्या पद्धतीने करा खात्री

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॅंका, ऑफिस, शाळा किंवा सिमकार्ड घेताना आधारकार्ड बंधनकारक नसल्याचे जरी न्यायालयाने स्पष्ट केले असले तरी आधारकार्ड हे महत्वाच्या ओळखपत्रांपैकी एक आहे. आधारकार्ड हे डिजिटल आय डी प्रूफ म्हणून वापरले जाते. आधारकार्ड यूनिक आइडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच UIDAI कडून जारी करण्यात येते.

पण गेल्या काही दिवसात आधार कार्डशी छेडछाड, आधार कार्डाचा डेटा लीक झाल्याच्या घटना उघडकीस आल्या होत्या. त्यानंतर आधारकार्डाच्या माहितीचा गैरवापर होऊ नये याकरिता न्यायालयाने आधार कार्ड बंधनकारक नसल्याचे सांगितले होते. आपल्या आधारकार्डाचा वापर कुठे होत आहे का ? हे तपासण्यासाठी नक्की करायचे काय ? याची माहिती घेऊया.

अशाप्रकारे मिळवा माहिती

— सर्वात आधी https://uidai.gov.in/ या वेबसाईटला लॉग इन करा. त्यानंतर my aadhar आधारवर क्लिक करा. त्यामध्ये आधार सर्व्हिसेस या सेक्शनला सिलेक्ट करा. त्यानंतर आधार ऑथेंटिकेशन हिस्ट्री पर्यायावर क्लिक करा.

— त्यानंतर रिडायरेक्टेड पेजवर जा. तिथे तुमचा १२ अंकी आधार क्रमांक CAPTCHA यासह टाका. त्यानंतर ओटीपी सेंडवर क्लिक करा. यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल.

— पुढील पेजवर जाऊन अगोदरचे ऑप्शन ऑथेंटिकेशन टाईप निवडा आणि ऑल म्हणून डिफॉल्ट सेट करा.

— पुढील पेजवर गेल्यानंतर तुम्हाला सर्व आधार ऑथेंटिकेशन रिक्वेस्टची यादी दिसेल. या यादीला पीडीएफ फॉर्ममध्ये डाउनलोड करता येतं. ही यादी उघड करण्यासाठी पासवर्डची गरज असते. ही यादी बघण्यासाठी तुमच्या नावाचे पहिले चार अक्षर आणि जन्म तारिख टाकणे गरजेचे आहे.

त्यानंतर या यादीमध्ये तुमचे आधार कार्ड कुठे कुठे वापरलं आहे, याची संपूर्ण माहिती मिळेल. या यादीमध्ये तुम्हाला काही संशयास्पद वाटले तर, तुम्ही UIDAI ला संपर्क साधून याबाबत तक्रार करु शकता. याची तातडीने तक्रार घेतली जाणार आहे.

परंतू यासाठी तुम्हाला १९४७ टोल फ्री क्रमांकावर कॉल करावा लागेल. तसेच [email protected] या वेबसाईटवरही आपली तक्रार नोंदवता येणार आहे.