इस्त्रायलमध्ये आता मास्क घालण्याची आवश्यक नाही, असा आदेश देणारा जगातील पहिला देश !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   कोरोनापासून वाचण्यासाठी मास्क सर्वात परिणामकारक शस्त्र असल्याचे डब्ल्यूएचओ सांगत आहे. परंतु, इस्त्रायल जगातील पहिला देश बनला आहे, जिथे मास्क न घालण्याचे आदेश दिले गेले आहेत.

होय, इस्त्रायलमध्ये प्रशासनाने लोकांना मास्क न वापरण्याचे आदेश दिले आहेत. येथे 81 टक्के लोकांना कोरोना व्हॅक्सीन दिली गेली आहे, ज्यानंतर प्रशासनाने हा निर्णय दिला आहे. सरकारच्या या आदेशानंतर लोकांना आपल्या चेहर्‍यावरील मास्क काढून टाकले आणि सोशल मीडियावर आनंद साजरा केला.

इस्त्रायलमध्ये 16 वर्षापेक्षा जास्त वयाच्या 81 टक्के लोकांना कोरोना लसीचे दोन डोस दिले गेले आहेत. तर व्हॅक्सीनेशनमधील वेगाने येथे कोरोना संसर्ग आणि हॉस्पिटलमध्ये दाखल होणार्‍या रूग्णांच्या संख्येत वेगाने घसरण झाली आहे. मात्र, इस्त्रायलमध्ये प्रतिबंध अजूनही लागू आहेत. परदेशी लोकांना प्रवेश आणि लस न घेता प्रवेश बंदी आहे.

आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली की, इस्त्रायलने देशात नवीन भारतीय व्हेरियंटच्या 7 केस शोधल्या आहेत आणि त्यांची तपासणी केली जात आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी पत्रकारांना सांगितले की, कोरोना व्हायरसविरूद्ध जिंकण्याच्या बाबतीत आपण यावेळी जगाचे नेतृत्व करत आहोत. मात्र, त्यांनी पुढे म्हटले की, अजूनही कोरोना विरूद्धची लढाई पूर्णपणे संपलेली नाही. तो पुन्हा परतू शकतो.

इस्त्रायलची लोकसंख्या 1 कोटीपेक्षा कमी आहे आणि येथे आतापर्यंत एकुण 8 लाखांपेक्षा जास्त प्रकरणे समोर आली आहेत, तर 6 हजारपेक्षा जास्त लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.